शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भूखंडांच्या भाडेकराराचे नूतनीकरण

By admin | Updated: June 8, 2017 06:20 IST

खासगी संस्थांना भाडेकरारावर दिलेल्या भूखंडांच्या भाडकेकरार नूतनीकरणाच्या नवीन धोरणानुसार महानगरपालिकेला जास्त महसूल मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खासगी संस्थांना भाडेकरारावर दिलेल्या भूखंडांच्या भाडकेकरार नूतनीकरणाच्या नवीन धोरणानुसार महानगरपालिकेला जास्त महसूल मिळणार आहे. या धोरणातून महालक्ष्मी रेसकोर्ससह वेलिंग्टन क्लब अशा मोठ्या भूखंडांना वगळले आहे. विशेष म्हणजे कायमस्वरूपी भाडेतत्त्वावरील १२४७ भूखंड व ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर असलेले २१४८ भूखंडांचे भाडेकरार ३० वर्षांचे होणार आहेत.मुंबई शहर सुधार विश्वस्त सन १९३३ मध्ये महापालिकेत विलीन झाल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अखत्यारित येत असलेले सर्व भूखंड हे महापालिकेच्या ताब्यात आले. ४ हजार १७७ भूखंड हे कायमस्वरुपी, ९९ वर्षे ते दहा वर्षे या कालावधीसाठी भाडेकरारावर दिलेले आहेत. यातील २४२ भूखंडांचे भाडेकरार संपुष्टात आलेले असून त्यांचे नूतनीकरण झालेले नाही. महापालिकेने ४ हजार १७७ भाडेकरारावर दिलेल्या भूखंडांच्या नूतनीकरणासंदर्भातील धोरणाचे सुधार समितीच्या बैठकीत सादरीकरण केले. या सादरीकरणानंतर या धोरणाला मंजुरी देण्यात आली.नव्या धोरणानुसार मुंबई महानगरपालिकेच्या ज्या भूखंडांवर २५ टक्क्यांहून कमी बांधकाम आहेत; अशा व मनोरंजन, खेळाच्या मैदानासाठीच्या राखीव भूखंडांचा भाडेकरार वाढवण्यात येणार नाही. यामुळे असे भूखंड पालिकेकडेच राहणार आहेत. भाडेकरारात कोणतेही बदल झाल्यास असे बदल पालिकेच्या निदर्शनास आल्यावर या भूखंडांचे जुने करार रद्द होऊन त्याचे रूपांतर ३० वर्षांसाठी केले जाणार आहे.>पुनर्बांधणी करणे शक्य४१७७ पैकी २४२ भूखंडांचे भाडेकरार या नव्या धोरणानुसार केले जाणार आहेत. तसेच अनेक भूखंडांवरील इमारती जीर्ण झाल्याने त्याची पुनर्बांधणी करणे शक्य होणार आहे. जुन्या धोरणानुसार एका चौरस मीटरला एक रुपया भाडे पालिकेला मिळत होते. आता भाडेकरारात कोणताही बदल झाल्यास महापालिकेला रेडीरेकनरनुसार एक टक्का भाडे मिळणार आहे. यामुळे पालिकेचा महसूल वाढणार आहे.