शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उदयनराजे यांची नाराजी दूर करण्यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 03:31 IST

विधानसभा निवडणुकीसोबत सातार लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर न झाल्याने भाजपात दाखल झालेले माजी खासदार उदयनराजे कमालीचे नाराज झाले होते.

सातारा : विधानसभा निवडणुकीसोबत सातार लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर न झाल्याने भाजपात दाखल झालेले माजी खासदार उदयनराजे कमालीचे नाराज झाले होते. राजीनामा देण्याआधी विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभेचीही पोटनिवडणूक घेण्यात यावी, अशी अट त्यांनी भाजपला घातली होती. विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला गेला, तेव्हा लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसल्याने हा उदयनराजेंसाठी मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर पुण्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील खासदार व इतर लोकप्रतिनिधींच्या मेळाव्याकडे उदयनराजेंनी पाठ फिरवली होती. त्यामुळे उदयनराजे भोसले भाजपपासून दूर गेलेत का अशीही चर्चा सुरू झाली होती.या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे....तर मी अर्जच भरणार नाही - उदयनराजेपोटनिवडणुकीची अधिसूचना जारी होताच उदयनराजे भावूक झाले. प्रतापसिंह महाराजांनंतर (डॅडींनंतर) जर मला कोणी खरं प्रेम दिलं असेल तर ते शरद पवार यांनी दिलं. त्यामुळे सातारा लोकसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लढवणार असतील तर त्यांच्या विरुद्ध मी अर्जही भरणार नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया दिली.श्रीनिवास पाटील यांचे नाव आघाडीवरउदयनराजे भोसले यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार उभा करण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे. या संदर्भात उद्या (बुधवारी) मुंबईत राष्ट्रवादीची बैठक होत आहे. या बैठकीत माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSharad Pawarशरद पवार