शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अडथळा आणणारी अतिक्रमणे काढा

By admin | Updated: June 9, 2016 00:55 IST

शहरात अनेक ठिकाणी फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने त्याचा परिणाम वाहतूक कोंडीत होतो़

पुणे : शहरात अनेक ठिकाणी फुटपाथवर अतिक्रमण झाल्याने त्याचा परिणाम वाहतूक कोंडीत होतो़ यासह सर्व अतिक्रमणे काढावीत, अशा सूचना वाहतूक सल्लागार समितीच्या सदस्यांनी बुधवारच्या बैठकीत केल्या़ तब्बल ३ वर्षांनंतर वाहतूक सल्लागार समितीची बैठक बुधवारी पोलीस आयुक्तालयात पार पडली. बैठकीमध्ये सल्लागारांनी सुचविलेल्या सूचनांचे पोलीस आयुक्तांनी स्वागत केले असून महत्त्वाच्या सूचनांवर विचार करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबात संबंधित अधिकाऱ्यांना सांगण्यात येईल, असे आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बैठकीत स्पष्ट केले.पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी १ एप्रिल रोजी पदभार स्वीकारला तर दोन आठवड्यांपूर्वी उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी वाहतूक शाखेची सूत्रे स्वीकारली. पूर्वीच्या काळात काय झाले, यावर चर्चा करण्यापेक्षा यापुढे वाहतूक समस्या सोडविण्यासाठी काय करता येईल, यावर बोलण्यासाठी ही बैठक आयोजिण्यात आल्याचे आयुक्तांकडून स्पष्ट करण्यात आले. बैठकीला महानगरपालिका आणि आरटीओ कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. सल्लागार समितीचे जवळपास सर्वच सदस्य बैठकीस हजर होते.शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणावर शाळा आणि महाविद्यालये आहेत. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी परिसरात कोंडी होते. ती सोडविण्यासाठी संबंधित शाळा अथवा महाविद्यालयांना त्यांचे शिपाई वाहतूक नियमनासाठी नेमावे, अशी सूचना सल्लागार समितीचे सदस्य अ‍ॅड. राहुल पाटील यांनी केली. त्यांच्या सूचनेची नोंद घेण्यात आली. वाहतूक नियमनासाठी स्वयंसेवक तयार करण्याची सूचनादेखील या वेळी करण्यात आली. आॅगस्ट २०१६ मध्ये पुन्हा एकदा सल्लागार समितीची बैठक घेण्यात येणार असून सुचविण्यात आलेल्या योग्य सूचनांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त शुक्ला यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)>कडक कारवाईची मागणी शहरातील काही परिसरात फुटपाथवर अतिक्रमण असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे मनपाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ अतिक्रमण हटविण्याची मोहीम उघडावी, असे सांगण्यात आले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्तकारवाई करण्यात यावी, तसेच पोलिसांकडूनदेखील वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे, अशी सूचना सल्लागार सदस्यांनी केली.