शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

फॅन्सी नंबर प्लेट जागेवरच काढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2015 09:37 IST

कारवाईदरम्यान वाहनावरील फॅन्सी नंबर प्लेट लगेच काढून घेणे आवश्यक आहे, असे सांगत परिवहन अधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार आहेत की नाही यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करा ,

नागपूर : कारवाईदरम्यान वाहनावरील फॅन्सी नंबर प्लेट लगेच काढून घेणे आवश्यक आहे, असे सांगत परिवहन अधिकाऱ्यांना याबाबतचे अधिकार आहेत की नाही यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करा ,असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिले.यासंदर्भात सत्पालसिंग रसपालसिंग रेणू यांनी फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात. केंद्र शासनाने २८ मार्च २००१ रोजी अधिसूचना काढून हाय सेक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट्सचा नियम लागू केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ७ एप्रिल २०११ रोजी सर्व राज्यांना या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, आजही नंबर प्लेटचा आकार, अंकांचा आकार, रंग आदी नियमांचे पालन होत नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.च्राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करून दंड वाढविण्याची बाब केंद्र शासनाच्या अखत्यारित येत असल्याचे स्पष्ट केले आहे. मोटर वाहन कायदा-१९८८ व केंद्रीय मोटर वाहन नियम-१९८९ केंद्र शासनाच्या अधिकारक्षेत्रात आहे. फॅन्सी नंबर प्लेटमुळे नियम-१९८९ मधील तरतुदींचे (नियम-५०) उल्लंघन होते. नियम-१९८९ मध्ये दंड आकारण्याची तरतूद नाही. च्यामुळे कायदा-१९८८ मधील कलम १७७ अंतर्गत पहिल्या गुन्ह्णासाठी १०० रुपये तर, दुसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्णांसाठी ३०० रुपये दंड आकारण्यात येतो, असे राज्य शासनाचे म्हणणे आहे. ही बाब लक्षात घेता केंद्र शासनाला प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले पण, त्यांनी अद्यापही उत्तर सादर केले नाही.