शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींना दिलासा, वाढीव सेवाशुल्क कर रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 05:56 IST

आता ६६५ ऐवजी २५० रुपयेच आकारणार

मुंबई : मुंबईतील म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींचे मासिक ६६५.५० रुपये वाढीव सेवाशुल्क रद्द करून पूर्वीचे २५० रुपयेच सेवाशुल्क आकारले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. काँग्रेसचे आमदार अमीन पटेल, भाजपा आमदार आशिष शेलार, ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या इमारती धोकादायक झाल्या असून त्यांच्यासाठी पुनर्विकास योजना लवकरच लागू करण्यात येईल, अशी घोषणाही उपमुख्यमंत्र्यांनी केली.

गिरगाव, वरळी, लोअर परळ भागातील ४८३ गाळेधारकांना थकबाकी भरण्याबाबत नोटीशी बजावण्यात आलेल्या आहेत. उपकरप्राप्त इमारतीच्या डागडुजीवर होणारा खर्च, मालमत्ता कर, जल आकार व सामायिक विद्युत देयक यासाठी प्रति गाळा प्रतिमाह खर्च साधारणत: २ हजार रुपये आहे. यासाठी मार्च २०१९ पर्यंत दरमहा २५० रुपये सेवाशुल्क आकारले जात होते. 

एप्रिल २०१९ पासून त्यात ५०० रुपये वाढ करून प्रतिवर्ष १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार सद्य:स्थितीत ६६५.५० रुपये शुल्क आकारले जात आहे.

कर माफ करा अथवा नाममात्र घ्या!एकीकडे मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला असून झोपडपट्टीतील घरांना मालमत्ता कर आकारला जात नाही. मग म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींना हा कर कशासाठी? तो माफ करा अथवा नाममात्र घ्या, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. त्यानंतर ही  वाढ रद्द करण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. 

टॅग्स :mhadaम्हाडाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन