शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बारसू प्रकल्पविरोधक शेतकऱ्यांना दिलासा; मनाई आदेश मागे घेतला, सरकारची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 06:31 IST

प्रकल्पविरोधक शेतकऱ्यांविरोधातील याचिका निकाली काढताना फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लावणे तर्कसंगत नाही

मुंबई - बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आठ शेतकऱ्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रवेशास तसेच प्रकल्पाविरोधात सोशल मीडियावर पोस्ट करण्यास मनाई करणारा, असे दोन्ही आदेश सरकारने मागे घेतले आहेत. यासंदर्भातील माहिती राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात दिली. सरकारी वकिलांच्या या माहितीनंतर न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढली.

प्रकल्पविरोधक शेतकऱ्यांविरोधातील याचिका निकाली काढताना फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लावणे तर्कसंगत नाही. असा आदेश काढल्याने लोक उदरनिर्वाह गमावतील. त्यांना रोखले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. 

प्रकरण काय?राज्य सरकारने २२ आणि २५ एप्रिल २०२३ रोजी दोन आदेश काढत अमोल बोले व अन्य सात शेतकऱ्यांना राजापूर तालुक्यात ३१ मेपर्यंत प्रवेश करण्यास मनाई केली. तसेच रिफायनरी प्रकल्पाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करण्यास मनाई करणारा आदेशही काढला. बोले व अन्य सात जणांनी आदेश रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

याचिकेत काय?सीआरपीसी १४४ (२) अंतर्गत आदेश देत याचिकादारांना गावाबाहेर राहण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाने सरकार याचिकादारांना शस्त्रांशिवाय शांततेने एकत्र येण्याचा  तसेच भाषण व अभिव्यक्तिस्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच घटनेने हमी दिलेल्या मुक्तपणे संचार करण्याच्या स्वातंत्र्यावरही घाला घालण्यात येत आहे,  असे याचिकादारांचे वकील मिहीर देसाई, विजय हिरेमठ यांनी न्यायालयाला सांगितले. याचिकादार व काही रहिवासी प्रस्तावित रत्नागिरी अँड पेट्रोकेमिकल्स प्रा.लि. विरोधात आहेत. कारण त्यामुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होणार आहे. २०१७ पासून याचिकादार प्रस्तावित रिफायनरीला विरोध करत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Barsu Refinery Projectबारसू रिफायनरी प्रकल्प