शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

दिलासा : दाखल्यांसाठी आता १० जुलैची मुदत, सर्व्हरची क्षमता वाढविण्याचा निर्णय

By दीपक भातुसे | Updated: July 1, 2023 09:05 IST

Mumbai: राज्यात लाखो विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू असताना महाऑनलाइन संकेतस्थळावर, तसेच सेतू केंद्रावर सर्व्हरच्या गोंधळामुळे दाखले मिळेनासे झाले आहेत. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकार दाखले सादर करण्याची मुदत १० जुलैपर्यंत वाढविणार आहे.

- दीपक भातुसे मुंबई : राज्यात लाखो विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू असताना महाऑनलाइन संकेतस्थळावर, तसेच सेतू केंद्रावर सर्व्हरच्या गोंधळामुळे दाखले मिळेनासे झाले आहेत. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकार दाखले सादर करण्याची मुदत १० जुलैपर्यंत वाढविणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांत सर्व्हरची क्षमता वाढवून ही अडचणही दूर केली जाणार असल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

केवळ विद्यार्थीच नव्हे, तर विविध कामांसाठी राज्यातील जनतेला विविध दाखल्यांची गरज लागते. मात्र, सध्या तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाइन, तसेच सेतू केंद्रावर दाखले मिळण्यास प्रचंड विलंब लागत आहे. यात निवासाचा दाखला, जातप्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला अशा विविध दाखल्यांचा समावेश आहे. दाखले मिळत नसल्याने महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी हुकते की काय, अशी विशेषतः आरक्षित जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होती. 'लोकमत'ने ही अडचण समोर आणली होती. त्याची दखल सरकारने घेतली आहे.

अर्जांची संख्या वाढली- सर्व्हर गती मंदावल्याने दाखले विलंबाने मिळत आहेत. पूर्वी ३० सेकंद ते १ मिनिटाला एक दाखला काढणे शक्य होते.- मात्र, अर्जांची संख्या प्रचंड वाढल्याने सर्व्हरवर ताण येतो आहे. त्यामुळे एक दाखला काढायला ५ ते ६ मिनिटे लागत आहेत.- एका सेतू केंद्रावर साधारणतः १५ ते २० हजार अर्ज येतात. मात्र, सध्या काही सेतू केंद्रांवर हा आकडा ५० ते ६० हजारांच्या घरात गेला आहे.-मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून सर्व्हरची गती मंदावल्याच्या तक्रारी आहेत. विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्याची आम्ही सर्व्हरची संख्या वाढवत आहोत. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर अर्जाचा निपटारा जलद गतीने होऊ शकेल. -पराग जैन, प्रधान सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र