शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

रखडलेले निकाल जाहीर करा : युवासेनेचे आंदोलन

By admin | Updated: July 27, 2016 02:39 IST

विद्यापीठातर्फे एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात आलेल्या १६५ परीक्षांचे निकाल अद्यापही रखडले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशावर होत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या

मुंबई : विद्यापीठातर्फे एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात आलेल्या १६५ परीक्षांचे निकाल अद्यापही रखडले आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेशावर होत आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कुलगुरूंना विद्यार्थी संघटनांशी चर्चा करण्याकरिता वेळच मिळत नसल्याने, विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या कारभाराविरोधात मंगळवारी युवासेनेने आंदोलन करत रोष व्यक्त केला.मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी विविध विषयांच्या ४२६ परीक्षा घेतल्या जातात. आतापर्यंत २६१ परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. यामधील ६५ परीक्षांचे निकाल ३० दिवसांत, ७९ निकाल ४५ दिवसांत, ११७ निकाल ४५ दिवस उलटून गेल्यानंतर जाहीर करण्यात आले आहेत. असे असले, तरी अजूनही १६५ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याविरोधात युवासेनेने आवाज उठवत मोर्चा काढला होता.विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर होणे बंधनकारक आहे. मात्र, विद्यापीठाने घेतलेल्या शेकडो परीक्षांचे निकाल अद्यापही रखडले आहेत. विशेष म्हणजे, जाहीर झालेल्या निकालांच्या गुणपत्रिका मिळत नसल्याने, विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षणासाठीचे प्रवेश रखडले आहेत. (प्रतिनिधी)विद्यार्थी संघटनांशी चर्चायुवासेनेने केलेल्या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने २ आॅगस्ट रोजी युवासेनेसह विद्यार्थी संघटनांसोबत विशेष बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच दर दोन महिन्यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांसोबत खास बैठक घेण्यात येईल, असेही आश्वासन देण्यात आल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.