शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

डीएपीचा हट्ट सोडा: गंधकाचा बोनस मिळवा

By admin | Updated: June 20, 2014 00:14 IST

कृषी विभागातर्फे शेतकर्‍यांमध्ये जागृती

वाशिम: खरिप पीक पेरणीसाठी शेतकर्‍यांना कोणते खत उपयुक्त आहे, सोयाबीनसाठी कोणत्या खताची मात्रा शास्त्रीयदृष्टया जास्त किफायतशिर ठरणार याचा फार्मूला वाशिमच्या कृषी विभागाने तयार केला आहे. केवळ डीएपी खताचा हट्ट धरणार्‍या शेतकर्‍यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याबरोबरच सोयाबीन उत्पादनवाढीचा दावा करणारा हा फाम्र्यूला आहे.याबाबत शेतकर्‍यांमध्ये जागृती केली जात आहे.गतवर्षी अतवृष्टीमुळे सोयाबीनच्या बियाण्याची टंचाई निर्माण झाली यावर उपाय म्हणून वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घरचेच सोयाबीन बियाणे वापरण्याचे आवाहन शेतकर्‍यांना केले आहे. घरच्या घरी बियाणे उगवणक्षमता कशी तपासावी याचे साधे सोपे तंत्रज्ञान शेतकर्‍यांना बहाल केल्यानंतर आता कृषी विभागाने खत वापरण्याचा नवा उपक्रम साकारला आहे. सोयाबीन पिकासाठी बहुतांश शेतकरी डीएपी खताची मागणी करतात.डीएपीमुळे उत्पादनात वाढ होते असा समज अनेक शेतकर्‍यांचा झाल्याने डीएपी खताची मागणी प्रचंड वाढली आहे. प्रत्यक्षात डीएपीमधून सोयाबीनला आवश्यक असणारे गंधक(सल्फर)अजिबाज मिळत नसल्याचा दावा वाशिमच्या कृषी विभागाने केला आहे. याउलट युरिया + एसएसपी + म्यूरेट ऑफ पोटॅश किंवा २0:२0:0:१३ + एसएसपी + म्यूरेट ऑफ पोटॅश या खताची मात्रा अनुक्रमे १६.५0 व १७.५0 एवढी सोयाबीनला दिली तर ते उत्तम ठरते.सोयाबीन तेलवर्गीय पीक असल्याने त्यास गंधकाची अतिरिक्त आवश्यकता असते. युरीया + एसएसपी + म्यूरेट ऑफ पोटॅश या खतांचा एकरी खर्च १७00 रूपयाच्या आसपास तर २0:२0:0:१३ + एसएसपी + म्यूरेट ऑफ पोटॅश या खतांचा एकरी खर्च २0८0 रूपये तर डीएपी + म्यूरेट ऑफ पोटॅश या खताचा एकरी खर्च २२00 रूपयाच्या घरात जातो. नत्र, स्फूरद व पालाशचे प्रमाण जवळपास सारखेच असल्याने शेतकर्‍यांनी कोणत्याही एकाच खताचा आग्रह धरू नये असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. याबाबत शेतकर्‍यांमध्ये जागृती सुध्दा केली जात आहे.