शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील पतसंस्थांची चाचणी लेखापरीक्षणातून सुटका : उच्च न्यायालयाचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 12:03 IST

राज्यातील २० टक्के पतसंस्थांचे दरवर्षी चाचणी लेखापरीक्षण करण्याचे पत्रक सहकार आयुक्तांनी १५ सप्टेंबर २०१७ रोजी काढले होते.

ठळक मुद्देदरवर्षी २० टक्के संस्थांच्या परीक्षणाचा निर्णय रद्दलेखापरीक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार कायद्याने सहकार आयुक्तांना नसल्याचे निरीक्षण

पुणे : दरवर्षी २० टक्के पतसंस्थांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकारच सहकार आयुक्तांना नाही. तसेच, एखाद्या संस्थेचा लेखापरीक्षण अहवाल संशयास्पद असल्यास त्याचे लेखापरीक्षण करण्याचे अधिकार सहकार आयुक्तांना आहेत, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडीपीठाचे न्यायाधीश संजय गंगापूरवाला व अरुण ढवळे यांनी सहकार आयुक्तांचे परिपत्रक रद्द करण्याचा आदेश दिला. राज्यातील २० टक्के पतसंस्थांचे दरवर्षी चाचणी लेखापरीक्षण करण्याचे पत्रक सहकार आयुक्तांनी १५ सप्टेंबर २०१७ रोजी काढले होते. राज्यातील सर्व पतसंस्थांचे पाच वर्षांतून एकदा चाचणी लेखापरीक्षण करण्याचा उद्देश त्यामागे होता. अनेक पतसंस्था डबघाईला जात असल्याने हा निर्णय त्यावेळी घेतला होता. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. सहकारी संस्था अधिनियम १९०६च्या कलम ८१ (३) ‘क’च्या विरोधी परिपत्रक असल्याचा दावा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने केला होता. सहकारी अधिनियमानुसार सहकार आयुक्तांना २० टक्के संस्थांचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचा अधिकार नाही. तसेच, या पत्रकाला सरकारची देखील मंजुरी नाही. केवळ सरकारच लोकहितास्तव अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकते. एखाद्या पतसंस्थेने सादर केलेला लेखापरीक्षण अहवाल अयोग्य वाटल्यास सहकार आयुक्त संबंधिक संस्थेचे चाचणी लेखापरीक्षण अथवा पुर्नलेखापरीक्षण देखील करु शकते. सहकार आयुक्तांना पतसंस्थांच्या लेखापरीक्षणाबाबत व्यापक अधिकार आहेत. मात्र, अशा प्रकारे २० टक्के लेखापरीक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार कायद्याने सहकार आयुक्तांना नसल्याचे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने पतसंस्था फेडरेशनच्या बाजूने हा निर्णय दिला. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले, अनेक पतसंस्था अडचणीत येत असल्याने चाचणी लेखापरीक्षणाचा निर्णय घेण्यात आल्याचे, त्यावेळी सहकार आयुक्तांनी सांगितले होते. मात्र, गेल्या ५ वर्षांत पतसंस्था डबघाईला येण्याचे प्रमाण घटले आहे. या शिवाय सहकार विभागाने मान्यता दिलेल्या लेखापरीक्षकाकडून पतसंस्था लेखापरीक्षण करतात. असे असताना सरसकट मोठ्या संख्येने पतसंस्थांचे चाचणी लेखापरीक्षण करणे म्हणजे स्वत:च्याच लेखापरीक्षकांवर शंका उपस्थित करण्यासारखे होते. त्यामुळे संबंधित परिपत्रक निरर्थक होते. न्यायालयाने देखील आमची बाजू ग्राह्य धरली आहे. 

टॅग्स :PuneपुणेbankबँकHigh Courtउच्च न्यायालय