शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

गर्भाशय प्रत्यारोपणाच्या यशस्वितेवर पुन्हा मोहोर

By admin | Updated: July 6, 2017 03:27 IST

पुण्यात झालेल्या देशातील पहिल्या गर्भाशय प्रत्यारोपणावर यशस्वितेची आणखी एक मोहोर उमटली आहे. दोन्ही महिलांना नैसर्गिकरीत्या मासिक पाळी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुण्यात झालेल्या देशातील पहिल्या गर्भाशय प्रत्यारोपणावर यशस्वितेची आणखी एक मोहोर उमटली आहे. दोन्ही महिलांना नैसर्गिकरीत्या मासिक पाळी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्यारोपण केलेले गर्भाशय नैसर्गिकरीत्या काम करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. गर्भाशय प्रत्यारोपणाच्या दोन यशस्वी शस्त्रक्रियांनंतर देशभरातूनच नव्हे, तर जगभरातून २०५ महिलांनी शस्त्रक्रियांसाठी नावनोंदणी केली आहे. पुण्यातील गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलमध्ये ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. हॉस्पिटलच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त गर्भाशय प्रत्यारोपणाचे विभागाचे तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. या वेळी शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे प्रमुख डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी ही माहिती दिली. डॉ. पुणतांबेकर म्हणाले, की जन्मत: गर्भाशय नसलेल्या स्त्रीचे दु:ख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. सॅनिटरी नॅपकिनची जाहिरात पाहिली तरी तिच्या डोळ््यात पाणी येते. यशस्वी गर्भाशय प्रत्यारोपणामुळे मातृत्वाच्या सुखाबाबत आशेचा किरण निर्माण झाला आहे. या शस्त्रक्रियेसाठी २० लाखांच्या घरात खर्च येतो. गरजू रुग्णांना हे उपचार दोन-अडीच लाखांत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येक संशोधनाची चर्चा, चिकित्सा व्हायला हवी. चिकित्सा अथवा विरोधातूनच विज्ञानाची प्रगती होते. त्यातूनच मार्गदर्शक तत्त्वे तयार होऊ शकतात. प्रत्यारोपणाच्या बाबतीत काही कायदेशीर आणि नैतिक बाबी आहेत, त्यावरही लवकरच तोडगा निघेल.आम्ही तीन वर्षांपूर्वी गर्भाशय प्रत्यारोपणाचे स्वप्न पाहिले. कालमर्यादा असलेल्या स्वप्न हेच आमचे ध्येय बनले, असे सांगून डॉ. पुणतांबेकर म्हणाले, ‘‘प्रत्यारोपणाचा प्रयोग हा एक दिवसाचा विचार नसून, त्यामागे खूप कष्ट दडलेले आहेत. मी, पंकज कुलकर्णी आणि मिलिंद तेलंग यांनी तीन आठवडे स्वीडनला जाऊन प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यात परतून शस्त्रक्रियेच्या दृष्टीने तयारी आणि प्रयत्न केले. आपल्याला राजकीय लोकांना दोष देण्याची सवय लागली आहे. मात्र, प्रत्यारोपणाची तयारी, परवानगी यासाठी सरकारने विशिष्ट दिशेने काम केले. सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी अंगात दिव्य संचारल्याप्रमाणे काम पूर्णत्वाला नेले.’’प्रत्यारोपण, अवयवदान हा संजीवनी मंत्र : मुक्ता टिळकमहिला, तरुणींना निसर्गत:च मातृत्वाची ओढ असते. गर्भाशय प्रत्यारोपणाच्या माध्यमातून निसर्गाने अन्याय केलेला विज्ञानाच्या मदतीने दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न गॅलॅक्सी हॉस्पिटलने केला आहे. प्रत्यारोपण, अवयवदान हा संजीवनी मंत्र ठरत आहे, असे गौरवोद्गार महापौर मुक्ता टिळक यांनी काढले. गर्भाशय प्रत्यारोपण बाह्यरुग्ण विभागाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, ज्योत्स्ना एकबोटे, पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर मंगला कदम, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, गॅलॅक्सी केअर हॉस्पिटलचे डॉ. शैलेश पुणतांबेकर, डॉ. सीमा पुणतांबेकर, रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘‘भारतात पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली, ही केवळ झेप नव्हे, तर मोठी उडी आहे. गॅलॅक्सी हॉस्पिटलच्या रुपाने पुण्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे केंद्र निर्माण झाले आहे.’’या वेळी डॉ. संजीव जाधव, डॉ. उदय फडके, डॉ. सुहास हरदास यांच्यासह गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या सर्व डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. डॉ. मिलिंद तेलंग यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पंकज कुलकर्णी यांनी आभार मानले.गर्भाशय प्रत्यारोपणाच्या दोन यशस्वी शस्त्रक्रियांनी पुण्यात आणि पर्यायाने भारतात इतिहास घडला आहे. प्रत्यारोपण आणि अवयवदानाबाबत समाजात जनजागृती होण्याची गरज आहे. प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया हे आजवरच्या संशोधनाचे फलित आहे. यानिमित्ताने अनेक महिलांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. हजारो कुटुंबांना मिळालेली संजीवनी, यापेक्षा वेगळे दान काय असू शकते? महानगरपालिकेकडून अशा उपक्रमांचे स्वागत केले जाईल.मुक्ता टिळक, महापौरस्त्रीने अनेक क्षेत्रांमध्ये स्वत:चा ठसा उमटवला असला तरी तिचे आयुष्य मुलांभोवती फिरते. डॉक्टरांना देवाची उपमा का दिली जाते, हे डॉ. पुणतांबेकर आणि त्यांच्या टीमने सिद्ध केले आहे. अशा कौतुकास्पद उपक्रमांना सरकारकडून नेहमीच पाठबळ दिले जाईल.- मेधा कुलकर्णी, आमदार