शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल, लॉज, मनोरंजनासाठी महसूल विभागाचा परवाना रद्द

By admin | Updated: January 7, 2016 00:51 IST

महसूलचे नियंत्रण संपुष्टात : शासनाची नवीन नियमावली

मिरज : हॉटेल, धाबे, लॉजसह मनोरंजन कार्यक्रम व नाट्यगृहासाठी लागणारा महसूल विभागाचा परवाना नवीन वर्षापासून शासनाने रद्द केला आहे. हॉटेल, लॉज व मनोरंजन व्यवसायातील महसूल विभागाचे नियंत्रण रद्द करण्यात आले असून, नवीन नियमावली तयार करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश गृह विभागाच्या नवीन परिपत्रकात देण्यात आले आहेत. हॉटेल, लॉज सुरू करण्यासाठी तहसीलदारांकडून खाद्यगृह नोंदणी प्रमाणपत्र व परवाना, प्रांताधिकाऱ्यांकडून लॉजिंग व्यवसायासाठी आदरातिथ्य परवाना घ्यावा लागतो. महसूल विभागाकडून हे परवाने मिळविण्याची प्रक्रिया किचकट आहे. खाद्यगृह व लॉजिंग परवान्यासाठी वाणिज्य वापराची अट असल्याने राज्यात हजारो हॉटेल्स व ढाबे विनापरवाना सुरू आहेत. मनोरंजन कार्यक्रम किंवा नाट्यगृह सुरू करण्यासाठी महसूल विभागाकडून सार्वजनिक मनोरंजन परवाना, सादरीकरण परवाना घ्यावा लागत होता. विनापरवाना हॉटेल व धाबे व लॉजवर दंडात्मक कारवाईचे अधिकार होते. दि. २२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने गृह सचिवांनी परिपत्रक काढून हॉटेल व मनोरंजन व्यवसायासाठी महसूल विभागामार्फत परवाने घेण्याची अट रद्द केली आहे. या आदेशाची अंमलबजावणी नवीन वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. यामुळे विनापरवाना असलेली हॉटेल्स व धाबे आता स्थानिक स्वराज्य संस्था व अन्न औषध विभागाच्या मजूरीनंतर अधिकृत ठरणार आहेत.यामुळे यापुढे स्थानिक स्वराज्य संस्था व अन्न औषध विभागाचा परवाना असल्यास हॉटेल लॉज व्यवसाय करता येणार आहे. मनोरंजन व्यवसायालाही महसूल विभागाच्या परवान्याची आवश्यकता असणार नाही. मात्र डान्सबारचा परवाना देताना सादरीकरण परवाना आवश्यक ठरणार आहे. (वार्ताहर)पोलिसांची झाली पंचाईतयापुढे मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात हॉटेल लॉज व मनोरंजन व्यवसायासाठी नवीन नियम तयार करावयाचे आहेत. महसूल विभागाचा परवाना नसलेल्या हॉटेल व लॉजेसवर पोलिसांना कारवाईचे अधिकार होते. मात्र परवान्याची अट रद्द झाल्याने महसूल परवान्यासाठी पोलिसांना कारवाईची आवश्यकता राहिलेली नाही.