मुंबई : संपुआ सरकारनियुक्त राज्यपालांनी राजीनामा द्यावा, यासाठी दबाव वाढत असला तरी राष्ट्रपतींनी सांगितले तरच आपण राजीनामा देऊ, अशी भूमिका राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी घेतली आहे. एका मल्याळम वृत्तवाहिनीशी बोलताना शंकरनारायणन म्हणाले की, केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी दोनदा माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. मात्र मी त्यांना माझा निर्णय सांगितला नाही. राज्यपाल हा राष्ट्रपतींचा प्रतिनिधी असतो आणि तेच त्यांच्या नेमणुका करतात. राज्यपालांचे पद घटनात्मक असून हे पद सोडण्याबाबत कोणीही माझ्याशी अधिकृतपणे आणि लेखी संवाद साधलेला नाही, असे त्यांनी सांगितले. लोकशाहीत कोणतेच पद कायमस्वरूपी नसते. मात्र योग्य प्रक्रिया पार पाडायला हवी. राज्यपालाचे पद सोडण्याबाबत योग्य प्राधिकाऱ्याने विचारणा केली तरच आपण निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
राजीनाम्यास राज्यपालांचा नकार
By admin | Updated: June 19, 2014 02:51 IST