शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी कायदा रद्द करण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2016 02:27 IST

केंद्र सरकारच्या महात्मा गांधी नॅशनल ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ अंतर्गत ग्रामीण नागरिकांना महाराष्ट्र रोजगार हमी कायदा १९७७ प्रमाणेच लाभ मिळत असल्याने राज्य

मुंबई : केंद्र सरकारच्या महात्मा गांधी नॅशनल ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ अंतर्गत ग्रामीण नागरिकांना महाराष्ट्र रोजगार हमी कायदा १९७७ प्रमाणेच लाभ मिळत असल्याने राज्य सरकारचा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. राज्य सरकारने केलेल्या कायद्याऐवजी केंद्र सरकारचा कायदा सुरू ठेवावा आणि राज्य सरकारचा कायदा रद्द करावा. तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत राज्य सरकारच्या कायद्यांतर्गत निधी जमा न करण्याचा आदेश राज्य सरकारला द्यावा, अशी मागणी आम आदमी लोकमंचने जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.याचिकेद्वारे करण्यात आलेले आरोप सामान्य स्वरूपाचे असल्याचे म्हणत खंडपीठाने ही याचिका फेटाळली. ‘केंद्र आणि राज्य सरकारचा कायदा सामान्यांच्या हितासाठीच आहे. नागरिकांना दोन्ही कायद्यांंतर्गत फायदा मिळत असेल तर आणि दोन्ही कायद्यांत विसंगती नसेल, तर याचिकाकर्त्यांची मागणी मान्य कशी करायची,’ असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला.‘निधीचा गैरवापर केल्याचा किंवा निधी अन्य कारणासाठी वळता केल्याचा आरोप असेल तर सामान्य नागरिक ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊ शकतात. कोणतीही अनियमितता निदर्शनास आणून न दिल्यामुळे आम्ही ही याचिका फेटाळत आहोत,’ असे खंडपीठाने म्हटले. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र रोजगार हमी कायदा, १९७७ एका वर्षानंतर अंमलात आला. ग्रामीण भागातील रोजगार उपलब्ध करून देणे, हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेवून केंद्र सरकारने २००५मध्ये नवा कायदा काढला. त्यामुळे राज्य सरकारचा कायदा अस्तित्वात असणे आवश्यक नाही. दोन्ही कायद्यांचा हेतू ग्रामीण भागातील जनतेला रोजगार पुरवणे आहे. त्यांना कमीतकमी अर्थार्जन मिळावे, हा यामागचा हेतू आहे. गेली कित्येक वर्षे या योजनांचा लाभ लोकांना मिळत आहे, असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)