शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

मिठागरातील भूमिपुत्रांचे पुनर्वसन करा!

By admin | Updated: May 18, 2016 03:56 IST

अनेक वर्षांपासून झोपडीवजा घरे बांधून वास्तव्य करणाऱ्या भूमिपुत्रांना पालिकेने रस्ता तयार करण्याच्या नावाखाली हुसकावून लावण्याचा कट रचला

भार्इंदर : मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळील गावदेवीनगर या मिठागराच्या भागात अनेक वर्षांपासून झोपडीवजा घरे बांधून वास्तव्य करणाऱ्या भूमिपुत्रांना पालिकेने रस्ता तयार करण्याच्या नावाखाली हुसकावून लावण्याचा कट रचला आहे. या सर्व भूमिपुत्रांचे पुनर्वसन पालिका जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत त्यांची घरे तोडू नका, अशी मागणी माजी आ. विवेक पंडित यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.हवालदिल झालेल्या या भूमिपुत्रांनी हक्काचे घर मिळावे, यासाठी पंडित यांच्याकडे धाव घेतली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी ते पालिकेत आले होते. गावदेवीनगर या मिठागराच्या जागेत वसलेल्या भूमिपुत्रांची घरे मिठागरामुळे सीआरझेडबाधित आहेत. या भूमिपुत्रांना घरांचा विकास न करताच झोपडीवजा घरांत वास्तव्य करावे लागत आहे. येथील सुमारे २५० एकर मिठागरांची जागा एका बड्या बिल्डरला आर्थिक तडजोडीतून देण्यात आल्याने हा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. मिठागर सीआरझेडबाधित असतानाही पालिका येथे २००० मधील मंजूर विकास आराखड्यानुसार राजकीय दबावातून विकासकाचे हित जोपासण्यासाठी रस्ता तयार करण्याचा घाट घालत आहे. त्यात ३६ भूमिपुत्रांची घरे आणि दुकाने बाधित होत असल्याने त्यांना पालिकेने स्थलांतरित करण्याचे ठरवले आहे. कनाकिया येथे विकसित केलेल्या इमारतींत त्या भूमिपुत्रांना पालिका बेघरांसाठी घर या योजनेंतर्गत घरे देणार आहे. बाधितांनी कागदपत्रे सादर केल्यास त्यांना घरे देण्याचे पालिकेने मान्य केले असले तरी २ घरे, ६ दुकाने अपात्र ठरवली आहेत. (प्रतिनिधी) >विवेक पंडीत यांची मागणीदुकानदारांकडे २००० पूर्वीचे गुमास्ता लायसन्स नसल्याचा दावा करून त्यांना अपात्र ठरवल्याने ते हवालदिल झाले आहेत. या सर्व बाधितांना केवळ निर्धारित कालावधीतील कागदपत्रे नसल्याचे कारण देत वारसा हक्काचा दावा अमान्य करणे योग्य नाही. अनेक वर्षांपासूनचे वास्तव्य असलेली कोणतीही कागदपत्रे वास्तव्याचा ठोस पुरावा मानून सर्व भूमिपुत्रांना कायमस्वरूपी घरे दिल्यानंतरच त्यांची घरे तोडण्यात यावीत.