शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांची नोंदणी अनिवार्य : धर्मादाय आयुक्तांचा आदेश, देवस्थानांमधील आर्थिक गैरव्यवहारास लागणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 03:47 IST

धार्मिक स्थळांमध्ये जमा होणारी देणगी आणि संपत्तीचा गैरवापर रोखण्यासाठी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि त्यांच्याकडील मालमत्तेची नोंदणी करण्याचे आदेश राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले आहेत.

गौरीशंकर घाळे मुंबई : धार्मिक स्थळांमध्ये जमा होणारी देणगी आणि संपत्तीचा गैरवापर रोखण्यासाठी राज्यातील सर्व धार्मिक स्थळे आणि त्यांच्याकडील मालमत्तेची नोंदणी करण्याचे आदेश राज्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिले आहेत.राज्यातील सर्व धर्मादाय सहआयुक्त, उपायुक्त आणि सहायक धर्मादाय आयुक्तांना आपापल्या क्षेत्रातील धार्मिक स्थळांची माहिती मागविण्यात आली आहे. गावांचे सरपंच, ग्रामसेवक किंवा तहसीलदारांकडून धार्मिक स्थळांची माहिती मागवून त्यांची नोंदणी करून घ्यावी. अनेक देवस्थाने व धार्मिक स्थळांकडे जमिनी आहेत. दिवाबत्तीसाठी राजे-महाराजांनी देवस्थानला या जमिनी इनाम दिल्या होत्या. अशा इनाम जमिनींची नोंद देवस्थानच्या परिशिष्टावर करून घ्यावी. शिवाय, धर्मादाय आयुक्तालयाच्या परवानगीशिवाय देवस्थान जमिनींची विक्री झाली असल्यास चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाईचे आदेशही आयुक्त डिगे यांनी दिले आहेत.विश्वस्तपदावरील पुजाºयांना हटवाअनेक पुजारी आणि विश्वस्त देवस्थानांचे उत्पन्न स्वत:कडे वळवतात. काही ठिकाणी पुजारीच विश्वस्त आहेत. देवस्थानांचे लाभार्थी देवस्थानांचे विश्वस्त होऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या लाभार्थ्यांना विश्वस्तपदावरून हटविण्याचे निर्देशही धर्मादाय आयुक्त डिगे यांनी दिले आहेत.देवस्थानांच्या रचनेत योग्य ते बदल करण्याच्या सूचना-राज्यात सुमारे ६५ हजार सर्वधर्मीय धार्मिक स्थळे असून, त्यापैकी अनेक देवस्थानांकडे देणगी, हुंडीच्या माध्यमातून भाविक मोठ्या प्रमाणावर संपत्ती अर्पण करतात. भक्तांच्या या समर्पणाचे नेमके काय होते, याचा कोणताच लेखाजोखा नसतो. देवस्थानांकडे जमा होणाºया निधीवर मोठ्या प्रमाणात पुजारीच डल्ला मारतात. त्यामुळे पुजारी गब्बर आणि देवस्थान गरीब अशी अवस्था अनेक ठिकाणी आहे. देवस्थानाकडे जमा होणारा निधी देवस्थान आणि त्या माध्यमातून समाजासाठीच खर्चिला गेला पाहिजे. यासाठी देवस्थानांच्या रचनेत योग्य ते बदल करण्याच्या सूचनाही परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Templeमंदिर