शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

तक्रार नोंदवण्यास शिक्षकांची पोलिसांकडे रीघ

By admin | Updated: April 20, 2017 05:55 IST

अल्पदरात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या सरोजकुमार सिंग याने पाच शिक्षकांच्या गटाचीही फसवणूक केली आहे.

ठाणे : अल्पदरात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या सरोजकुमार सिंग याने पाच शिक्षकांच्या गटाचीही फसवणूक केली आहे. त्यांच्याकडूनही त्याने सहा लाख २० हजार रुपये उकळल्याचे व त्याच्या अटकेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याच्याविरुद्धच्या तक्रारदारांची रीघच वर्तकनगर पोलीस ठाण्याकडे लागली आहे. त्याच्याविरुद्ध दुसरा गुन्हा बुधवारी दाखल झाला. दरम्यान, आधीच्या गुन्ह्यात त्याला ठाणे न्यायालयाने २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. भिवंडीतील काल्हेर आणि कशेळी भागांत सदनिका बुक केल्यास मोठी सवलत देतो. उर्वरित रक्कम सुलभ हप्त्याने भरा, अशी बतावणी करून सरोजकुमारने दीड लाखापासून ते सात लाखांपर्यंत अनेकांकडून रकमा घेतल्या. त्यांना सदनिका किंवा पैसेही न देता नंतर मात्र तो पसार झाला. सावरकरनगर भागातील नयनेश मोदी यांनाही कशेळी भागात सदनिका देण्याचे आमिष दाखवून मार्च २०१२ मध्ये त्यांच्याकडून त्याने सात लाख रुपये घेतले. त्याला १४ एप्रिल २०१७ रोजी सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने अटक केली. याशिवाय, त्याने अनिल गुप्ता यांच्याकडून एक लाख ५१ हजार रुपये, तर शीतलाप्रसाद जयस्वाल यांच्याकडून नऊ लाखांची वन बीएचके सदनिका बुकिंगसाठी २०१३ मध्ये दोन लाख रुपये त्याने घेतले होते. त्याला अटक केल्याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या आणखी सात ते आठ जणांनी पोलिसांशी संपर्क साधला. दुसरा गुन्हा रेणू सिंग यांच्या गटाने वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.जी. गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड याबाबतचा तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)