मुंबई : होमीओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रक्टिस करू देऊ नये, ही मागणी मान्य करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला़राज्य शासनाने फर्मान जारी करून आयुर्वेदिक, हामिओपॅथी, युनानी डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यास हिरवा कंदील दाखवला़ याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, त्यावर न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली़ त्यात शासनाच्या या निर्णयाचे अॅडव्होकेट जनरल सुनील मनोहर यांनी समर्थन केले़ राज्यात ७०० नागरिकांमागे एक अॅलोपॅथीचा डॉक्टर आहे़ यामुळे ग्रामीण भागात नेहमीच डॉक्टरांची कमतरता भासते़
गैर अॅलोपॅथी डॉक्टरांना मनाई करण्यास नकार
By admin | Updated: December 25, 2014 02:19 IST