शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी अन्य विभागात कपात : ३८७१ कोटींच्या पुरवणी मागण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 03:06 IST

मिनी बजेटच वाटावे, इतक्या प्रचंड रकमेच्या पुरवणी मागण्या दर अधिवेशनात मांडणाºया राज्य सरकारने, आज हा आकडा कमी करीत, ३ हजार ८७१ कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या. विधानसभेत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मागण्या मांडल्या.

विशेष प्रतिनिधी ।मुंबई : मिनी बजेटच वाटावे, इतक्या प्रचंड रकमेच्या पुरवणी मागण्या दर अधिवेशनात मांडणाºया राज्य सरकारने, आज हा आकडा कमी करीत, ३ हजार ८७१ कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या. विधानसभेत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मागण्या मांडल्या.यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच थकीत कर्जावरील २ हजार १२९ कोटी रुपयांची व्याजाची रक्कम भरण्यासह इतर काही विभागांना अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी या पुरवणी मागण्यांचा आधार सरकारला घ्यावा लागला आहे.या पुरवणी मागण्यांत सर्वाधिक रक्कम ही थकीत कर्जावरील व्याजाचा भरणा करण्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. ही रक्कम रिझर्व्ह बँकेकडून काढण्यात आलेल्या कर्जावरील व्याजाचा भरणा करण्यासाठी या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ अर्थात, शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी १४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली असून, मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाच्या खात्यातून २ हजार कोटी रुपये या योजनेकरिता वळते करण्यात आले होते. त्यानंतर, यंदाच्या वर्षी फक्त १४ कोटी रुपयांची तरतूद या पुरवणी मागण्यात करण्यात आली आहे. याचा अर्थ, कर्जमाफीच्या रकमेसाठी अन्य विभागांची आणखी काही रक्कम वळती केली जाण्याची शक्यता आहे.गृहविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह अन्य विभागांनाही या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने २६ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या, तर पावसाळी अधिवेशनात ३३ हजार कोटी रुपयांच्या मागण्या सादर करत त्या मंजूर केल्या होत्या. हे सरकार पुरवणी मागण्यांवरच सुरू असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली होती.विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनात प्रवेश करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन असे निर्धास्त होते.