शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
2
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
3
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
4
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
5
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
6
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...
7
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
8
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
10
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
11
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
12
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
13
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
14
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
15
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
16
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
17
नाशिकमध्ये सहा महिन्यांमध्ये १७ बलात्कार, अत्याचार होतात, गुन्हेही दाखल; पण...
18
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
19
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम
20
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!

पुण्याजवळ आढळला उत्तर अमेरिकेतला रेड फालोरोप

By admin | Updated: March 21, 2016 16:37 IST

उत्तर अमेरिकेतील आर्टिक व युरेशिया भागात आढळणारा रेड फालोरोप हा पक्षी शुक्रवारी 18 मार्च रोजी भिगवणजवळच्या उजनी जलाशयात दिसला.

राहुल उम्ब्रजकर, पुणे
उत्तर अमेरिकेतील आर्टिक व युरेशिया भागात आढळणारा रेड फालोरोप हा पक्षी शुक्रवारी 18 मार्च रोजी भिगवणजवळच्या उजनी जलाशयात दिसला. यापूर्वी सर्वप्रथम हा पक्षी राहुल सचदेव जे पुण्याचे रहिवासी असून प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार आणि पक्षीतज्ञ आहेत, यांना आणि सह छायाचित्रकार संगमेश्वर धत्तर्गी, जनकराजन सरवानन आणि श्रीहरी के यांच्या दृष्टीस आला होता. प्राथमिक दर्शनी हा रेड नेकड फालोरोप वाटला. पण सदर पक्ष्याच्या प्रतिमा पहिल्या नंतर सुप्रसिद्ध पक्षी निरीक्षक आणि पक्षी तज्ञ आदेश शिवकर यांनी सांगितले कि हा रेड फालोरोप आहे. आदेश शिवकर आणि राहुल सचदेव यांनी सांगितले कि सदर पक्ष्याचा एकतर स्थलांतर करताना रस्ता चुकला असावा किंवा तो त्याच्या थव्यातून दूर पडला असावा.
 
 
यापूर्वी नागपूर व राजस्थानमध्ये या पक्ष्याचे दर्शन घडले होते आणि आता हा भिगवणमध्ये आढळला ही पक्षीप्रेमींसाठी आनंदाची बाब आहे. 
मुख्यत्वे करून या पक्ष्यासाठी लागणारे खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध असणे हि फार मोठी आणि जमेची बाजू आहे . ह्या पक्ष्याचे वैशिष्ट म्हणजे हा नॉर्थ अमेरिकेच्या आर्टिक आणि युरेशिया या भागात आढळतो. ह्या अत्यंत दुर्मिळ पक्ष्याचे भिगवण येथे दर्शन म्हणजे खरोखर पक्षी निरीक्षक आणि पक्षी छायाचित्रकारांसाठी मेजवानीच होय, असे या दोन्ही पक्षी तज्ञांचे म्हणणे पडले.
 
 
(या पक्ष्याची सर्व छायाचित्रे राहुल उम्ब्रजकर यांनी घेतली आहेत )
 
अत्यंत दुर्मिळ असा हा पक्षी आपल्या भागात दिसला याचा अर्थ असा कि आपण आपली जलाशये आणि तेथील पर्यावरण याची खूप काळजीपूर्वक संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे, जेणे करून या सारख्या दुर्मिळ पक्ष्यांच्या दर्शनाचा आपणास लाभ घेता येईल. त्याच प्रकारे आता हे हि सिद्ध होत आहे कि भिगवण सारखी दलदलीची ठिकाणं पक्ष्यांसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची काळाची गरज आहे. असे आदेश शिवकर यांनी सांगितले.
 
- सदर पक्षी भारतात ३ वेळा दिसला आहे.
 - त्यापैकी साधारणपणे २०१३ साली नागपूर (महाराष्ट्र) मध्ये २०१२ साली ताल छप्पर (राजस्थान) येथे.
- आणि दिनांक १८ मार्च २०१६ रोजी भिगवण जिल्हा पुणे येथे उजनी च्या जलाशयात आढळला.
 
 
राहुल उंब्रजकर