शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

समुपदेशकांकडून वसुली

By admin | Updated: January 4, 2017 00:57 IST

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या समुपदेशकांना देण्यात आलेल्या अतिरिक्त मानधनाची वसुली करण्यात येत आहे. मानधन कमी करण्यात आल्याचा

- मिलिंद कीर्ती, चंद्रपूर

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत कार्यरत असणाऱ्या समुपदेशकांना देण्यात आलेल्या अतिरिक्त मानधनाची वसुली करण्यात येत आहे. मानधन कमी करण्यात आल्याचा आदेश उशिरा प्राप्त झाल्याने ही वसुली करण्यात येत आहे. त्यामुळे या समुपदेशकांना आधीच मानधन कमी मिळत असताना आता त्यांच्यावर अत्यल्प मिळकतीचे गंडांतर आले आहे.२०१२ मध्ये विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, वर्धा, वाशिम, गडचिरोली व भंडारा या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनअंतर्गत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (एनपीसीडीसीएस) सुरू करण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली. जून-२०१२ मध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर पदांवर कर्मचारी-अधिकाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात आली. त्या वेळी समुपदेशकांना कृती अंमलबजावणी आराखड्यात (पीआयपी) १२ हजार रुपये मासिक मानधन देण्यात आले. तसेच एनआरएचएमच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मानधनात आठ टक्के वाढ देण्यात आली. त्यानंतर २०१५-१६ मध्ये मानधनात पाच टक्के वाढ देण्यात आली.या दरवाढीप्रमाणे समुपदेशकांना आॅगस्ट-२०१६ पर्यंत १४ हजार २०८ रुपये मासिक मानधन देण्यात आले. त्यानंतर २०१६-१७ च्या पीआयपीमध्ये अचानक त्यांचे मानधन १० हजार रुपये करण्यात आले. तोपर्यंत एप्रिल ते आॅगस्टपर्यंत १४ हजार २०८ रुपयांप्रमाणे मानधन देण्यात आले होते. आता त्या सहा महिन्यांच्या १० हजार रुपयांपेक्षा अधिक दिलेल्या मानधनाची वसुली सुरू करण्यात येत आहे. मुंबई येथील आरोग्य भवनात सहसंचालक (असंसर्गजन्यरोग) डॉ. साधना तायडे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी केंद्र सरकारच्या स्तरावर मानधन कमी करण्यात आल्याचे सांगितले. तसेच केंद्राकडे सुधारित पीआयपी पाठविण्यात आल्याची माहितीही दिली.१४ हजारांऐवजी १० हजार इतके मानधनआधी समुपदेशकांना १४ हजार रुपये मानधन दिले जात होते. आता १० हजार रुपये मानधन मंजूर झाले आहे. केंद्रीय स्तरावरून ही रक्कम मंजूर झाली आहे. जिल्हास्तरावरून मागणी आल्यानंतर ती राज्यस्तरावरून केंद्राकडे पाठविण्यात आली आहे. केंद्राकडून सुधारित पीआयपी प्राप्त झालेले नाही, असे नागपूर येथील सर्कल प्रोग्रॅम मॅनेजर नंदनवार यांनी सांगितले.सध्या प्रत्येक महिन्याला जुन्या मानधनाची कपात केली जात आहे. त्यामुळे हातात केवळ अडीच ते तीन हजार रुपयांपर्यंत मानधन मिळते. एवढ्या कमी वेतनामध्ये कुटुंबाची जबाबदारी पार पाडणे कठीण होत आहे. - राम बारसागडे, समुपदेशक, चंद्रपूर