शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये डोंबिवलीच्या तरुणाचा विक्रम, १८ तास ५० मिनिटांत कापले ९२ किमी अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 06:06 IST

 - मुरलीधर भवारडोंबिवली : शहरातील स्टार कॉलनीत राहणाºया तुषार परब या तरुणाने २८ सप्टेंबरला हिमालयाच्या पर्वतरांगांत अल्ट्रा रनिंगमध्ये विक्रम केला आहे. १८ तास ५० मिनिटांत त्याने ९२ किलोमीटरचे अंतर पार केले आहे. समुद्रसपाटीपासून २ हजार ४०० ते ३ हजार ३०० मीटर उंचीवर सलग अल्ट्रा रनिंग त्याने केले आहे.तुषार याने गढवालमधील ...

 - मुरलीधर भवारडोंबिवली : शहरातील स्टार कॉलनीत राहणाºया तुषार परब या तरुणाने २८ सप्टेंबरला हिमालयाच्या पर्वतरांगांत अल्ट्रा रनिंगमध्ये विक्रम केला आहे. १८ तास ५० मिनिटांत त्याने ९२ किलोमीटरचे अंतर पार केले आहे. समुद्रसपाटीपासून २ हजार ४०० ते ३ हजार ३०० मीटर उंचीवर सलग अल्ट्रा रनिंग त्याने केले आहे.तुषार याने गढवालमधील उत्तर काशी जिल्ह्यातील भटवाडी, बारसू, दयारा, दारवा, दोडीताल, माँझी या विभागांतून १८ तास ५० मिनिटे अल्ट्रा रनिंग केले आहे. डेहराडून ते मसुरीपर्यंत हा रन तुषारने पार केला. तुषारने गढवालच्या बाराहात पर्वतरांगांत विक्रम केला. हा भाग हिमालयाच्या पर्वतरांगांत येतो.तुषारने मायक्रोबायोलॉजी या विषयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. तर ‘वाइल्डलाइफ कन्झर्व्हेशन’ विषयातून ८५ टक्के गुण मिळवून पदवी मिळवली आहे. २०११ पासून तुषार गिर्यारोहणाचे अनेक धाडसी उपक्रम करत आला आहे. शाळेत असताना त्याला मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची आवड होती. गढवालमधील एका मॅरेथॉन स्पर्धेत त्याने सहभाग घेतला. तेव्हापासून त्याच्या धाडसाला आणि साहसाला गढवालमधील हिमालयाची पर्वतश्रेणी खुणावत होती. ही पर्वतश्रेणी सर करण्याचा त्याचा मानस होता. गिरीविराज हायकर्स संस्थेतर्फे गिर्यारोहण क्षेत्रात त्याचे येणे झाले. गढवालमध्ये तो यापूर्वी २० पेक्षा जास्त वेळा गेला आहे. तुषारने २४ तासांत १२० किलोमीटर अल्ट्रा रनिंग करण्याचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले होते. त्याला ते लक्ष्य गाठता आले नाही. १८ तास ५० मिनिटांत त्याने केवळ ९२ किलोमीटर अंतर कापले आहे. पर्वतरांगांत धुके दाट असल्याने पुढे जाता आले नाही.आधीचा विक्रम शर्माच्या नावावरतुषारच्या पूर्वी अल्ट्रा रनिंगमध्ये १२० किलोमीटरचे अंतर २४ तासांत पूर्ण करण्याचा विक्रम प्रज्वल शर्मा याने केला असल्याची नोंद आहे. त्याच्या विक्रमापाठोपाठ तुषारचा विक्रम गणला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीnewsबातम्या