शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

आरक्षण रद्द करण्याची शिफारस!

By admin | Updated: November 17, 2015 01:04 IST

अनुसूचित जाती आणि जमाती हे प्रवर्गच शिक्षणातून वगळण्याची शिफारस शैक्षणिक मसुद्यात करण्यात आली असून त्याविरोधात शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांनी मुख्यमंत्र्यांकडे

पुणे : अनुसूचित जाती आणि जमाती हे प्रवर्गच शिक्षणातून वगळण्याची शिफारस शैक्षणिक मसुद्यात करण्यात आली असून त्याविरोधात शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे.शैक्षणिक मसुद्यातील शिफारशी म्हणजे सामाजिक न्यायाचे धोरण मोडीत काढण्याचा डाव असून, सरकारने हा आराखडा रद्द करावा, तसेच तो जनतेच्या अवलोकनासाठी खुला करावयाचा असेलच तर तो मराठीतूनही करावा, अशी मागणी दरक यांनी केली आहे.१९८६ नंतर प्रथमच देशाच्या ‘शैक्षणिक धोरण’ निर्मितीचे काम केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाने हाती घेतले आहे. त्यानुसार सुमारे २५ हजार गावांत बैठका झाल्या असून, केंद्राला पाठविण्याचा प्रस्तावित मसुदा तयार करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिलीे. आराखड्यातील तरतुदींबाबत दरक यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून आक्षेप नोंदविला. शासनाने घाईने आराखडा प्रसिद्ध केला असून तो जाणीवपूर्वक इंग्रजीतून प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे दरक यांनी सांगितले.आधुनिकीकरणाच्या नावाखाली सरकार दुर्बल घटकांच्या सुविधा कशासाठी रद्द करत आहे? एकीकडे डॉ. आंबेडकरांची स्मारके उभी करण्याचे श्रेय घ्यायचे, त्याच वेळी डॉ. आंबेडकरांनी घटनेत केलेल्या तरतुदी मोडीत काढून बहिष्कृत घटकांच्या सुविधाच रद्द करायच्या, असे सरकारचे धोरण दिसते. अगोदर शिक्षण व नंतर सर्वच क्षेत्रांतून आरक्षण संपविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आराखड्यातील पान क्रमांक ३४ वर शैक्षणिक सुविधांमधून अनुसूचित जाती, जमाती तथा विशेष गरजा असलेली मुले हे प्रवर्गच संपवून केवळ आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असे दोनच प्रवर्ग ठेवण्याची सूचना आहे. ही शासनाची गंभीर चलाखी असल्याचे दरक यांचे म्हणणे आहे.