शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘बंगाली देवदास’ चित्रपटाची दुर्मीळ प्रत मिळाली!

By admin | Updated: August 19, 2015 00:55 IST

सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पी. सी. बरुआ दिग्दर्शित १९३५मधील बंगाली भाषेतील ‘देवदास’ चित्रपटाची प्रत मिळविण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला यश मिळाले आहे

पुणे : सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पी. सी. बरुआ दिग्दर्शित १९३५मधील बंगाली भाषेतील ‘देवदास’ चित्रपटाची प्रत मिळविण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला यश मिळाले आहे. ‘देवदास’ या कादंबरीवर आधारित विविध भाषांमध्ये बनविल्या गेलेल्या चित्रपटांमधला हा पहिला बोलपट आहे. बांगलादेश चित्रपट संग्रहालयाकडून सोमवारी या चित्रपटाची डीव्हीडी एनएफएआयकडे सुपुर्द करण्यात आली असल्याची माहिती एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.बांगलादेशाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव मुर्तझा अहमद, बांगलादेश चित्रपट संग्रहालयाचे संचालक महम्मद हुसेन यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकाश मगदूम यांना ‘बंगाली देवदास’ची प्रत सुपुर्द केली. तर मगदूम यांनी त्यांना ‘राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या भारतीय चित्रपटाची प्रत भेट दिली. विशेष म्हणजे आपल्या देशात कुठेही या चित्रपटाची प्रत उपलब्ध नसल्यामुळे भारतीय चित्रपट इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण दस्ताऐवज हाती मिळाला आहे. याविषयी मगदूम म्हणाले, की बंगाली भाषेत हा चित्रपट सर्वप्रथम बनविला गेला असल्यामुळे बांगलादेश सरकारकडून ही प्रत मिळवण्यासाठी ३० वर्षांपासून चित्रपट संग्रहालय प्रयत्न करीत होते. भारतात या चित्रपटाची प्रत कुठेही उपलब्ध नाही. काही दिवसांपूर्वी कॅनबेरा चित्रपट महोत्सवादरम्यान बांगलादेश चित्रपट संग्रहालयाचे संचालक जहांगीर हुसेन यांचा ईमेलद्वारे पत्रव्यवहार सुरू होता.