शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कष्टाने केले स्वप्न साकार

By admin | Updated: May 11, 2016 01:06 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक सामान्य कुटुंबांतील तरुणांनी कष्ट आणि जिद्दीने प्रयत्न करून यश मिळविले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशपातळीवरील परीक्षेत आपला ठसा उमटविला

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक सामान्य कुटुंबांतील तरुणांनी कष्ट आणि जिद्दीने प्रयत्न करून यश मिळविले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशपातळीवरील परीक्षेत आपला ठसा उमटविला. प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आयएएस मुंबई येथे मेडिकल अभ्यासपूर्ण करत असताना आयएएस अधिकाऱ्यांचे काम जवळून पाहण्याची संधी मिळाली. श्रीकर परदेशी, प्रवीण गेडाम या मेडिकल क्षेत्रातून आयएएस पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून प्रेरणा घेऊन यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. तिसऱ्या प्रयत्नात मला यश मिळाले. माझ्यावर सोपविली जाणारी कोणतीही जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीन, असे राज्यात दुसरा क्रमांक पटकाविणाऱ्या श्रीकृष्णनाथ पांचाळ याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. श्रीकृष्णनाथ पांचाळ म्हणाला, मी मूळचा लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील असून, वडील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहेत तर आई गृहिणी आहे. मुंबई येथील ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमधून मेडिकलची पदवी घेत असताना काही आयएएस अधिकाऱ्यांशी संपर्क आला. त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांमुळे वैद्यकीय क्षेत्रात कोणते बदल घडू शकतात हे पाहता आले. त्यामुळे आपणही यूपीएससी परीक्षेची तयारी करून आयएएस व्हावे, अशी जिद्द उराशी बाळगून मी २0१३पासून परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. अभ्यास झालेला नसल्यामुळे २0१३च्या परीक्षेत मला यश मिळाले नाही. परंतु, २0१४च्या परीक्षेत मी मुलाखतीपर्यंत गेलो. त्यातून माझा आत्मविश्वास वाढला. आता २0१५च्या परीक्षेत देशात सोळावा आणि राज्यात दुसरा क्रमांक मिळाला. आयएएस अधिकारी म्हणून काम करताना अनेक मूलभूत बदल करणारे निर्णय घेता येतात. त्यामुळे जिल्हाधिकारी किंवा आयएएस करण्याचे मी ठरविले. एमपीएससी परीक्षेतून सहायक विक्रीकर आयुक्त म्हणून सेवेत रुजू झाल्यानंतर मी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. त्यातही मला १०१२ रँक मिळाली. परंतु मी यूपीएससीची नोकरी अद्याप स्वीकारली नव्हती. मला चांगला रँक मिळाला आहे. स्वत:च तयारी केली. परीक्षेत माझे काय चुकते याचा शोध घेतला आणि त्यात सुधारण करत गेलो. नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केला. त्यातून हे यश मिळाले- प्रवीण डोंगरे मी नारायणगाव येथील असून, मी कृषी क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. शिक्षण सुरू असतानाच यूपीएससीच्या अभ्यासाची सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये यापूर्वी निवड झाली आहे. वडील शेतकरी असून, आई गृहिणी आहे. यापूर्वी सेल्स टॅक्स परीक्षेत निवड झाली असताना वडिलांचे आयएसस व्हायचं स्वप्न पूर्ण करण्याचा आनंद होत आहे. -पूनम पाटे > यूपीएससीचे यशवंत-गुणवंतयोगेश कुंबेजकर 8श्रीकृष्ण पांचाळ 16 सौरभ गहरवार 46हनुमंत झेंडगे 50विशू महाजन 70निखिल पाठक 107स्वप्निल वानखडे 132स्वप्निल खरे 197राहुल पांडवे 200नवनाथ गव्हाणे 220हर्षल भोयर 233मुकुल कुलकर्णी 238रोहित घोडके 257अक्षय कोंडे 278रवींद्र खटाळे 283आशिष काटे 328पंकज खंडागळे 340अक्षय पाटील 344संजीव चेथुले 354दत्तात्रेय शिंदे 377विवेक भस्मे 395श्रीकांत सुसे 400रेहा जोशी 425वासुद तोरसेकर 440सायली ढोले 448कपिल गाडे 455संदीप भोसले 482स्वप्निल पुंडकर 487शिबी गहरवार 489अमित आसरे 490अदिती वाळूंज 491पूनम पाटे 497श्रद्धा पांडे 508तुषार वाघ 545विशाल साकोरे 568देवयानी हालाके 576प्रसाद मेनकुंदळे 599प्रवीण डोंगरे 601आकाश वानखडे 603किरण जाधव 614किरण शिंदे 618हृषीकेश खिल्लारी 627शरदचंद्र पवार 632गोपाल चौधरी 635कुलदीप सोनवणे 636विशाल नरवडे 640पवन बनसोड 674शशांक शेव्हरे 682श्रुती शेजोळे 690स्वप्निल कोठवडे 693राहुल तिरसे 705विनोद येरणे 709रामदास काळे 711स्वप्निल महाजन 720नितीश पाठोडे 723रोहन आगवणे 735समीर पाटील 746लक्ष्मीकांत सूयर्वंशी 750प्रांजल पाटील 773संदीप साठे 775विक्रम विरकर 784जय वाघमारे 788किशोर तांदळे 814शुभम ठाकरे 817ओमकारेश्वर कांचनगिरे 820संदीप पानदुले 826भूषण भिरुड 829संघमित्र खोब्रागडे 832योगेश पाटील 836रामदास भिसे 851स्वप्निल चौधरी 862राहुल गारूड 869प्रदीप मिरासे 896रोहित भैसारे 941अमोघ थोरात 966योगेश भारसत 1013राहुल माळी 1057स्नेहेल भापकर 1062इंद्रजित पांडे 1075