शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

म्हाडामुळे ९७२ जणांचे गृहस्वप्न साकार

By admin | Updated: August 11, 2016 04:30 IST

घर असावे घरासारखे’ असे स्वप्न घेऊन किंवा ‘कुणी घर देता का घर?’ या चिंतेतून म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज केलेल्या १ लाख ३६ हजार ५७७ जणांपैकी ९७२ जणांचे मुंबईतील घरांचे स्वप्न बुधवारी साकार

मुंबई : ‘घर असावे घरासारखे’ असे स्वप्न घेऊन किंवा ‘कुणी घर देता का घर?’ या चिंतेतून म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज केलेल्या १ लाख ३६ हजार ५७७ जणांपैकी ९७२ जणांचे मुंबईतील घरांचे स्वप्न बुधवारी साकार झाले. वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात जमलेल्या उत्सुक गर्दीतील काहींच्या डोळ््यांत आनंदांश्रू तरळले, तर काहींना निराश होऊन परतावे लागले. मुंबई शहर आणि उपनगरा७तील म्हाडाच्या घरांसाठी बुधवारी सोडत काढण्यात आली. सकाळी ९ वाजता सुरू झालेला हा सोडतीचा कार्यक्रम दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु होता. म्हाडाच्या अधिकाऱ्यांमधून नेमण्यात आलेल्या पंचांसह उपस्थित प्रेक्षकांमधून निवडण्यात आलेल्या तीन पंचाच्या उपस्थितीत घरांच्या सोडतीचा सोहळा पार पडला. सोडतीचा कार्यक्रम पाहण्यासाठी दाखल झालेल्या अर्जदारांमुळे रंगशारदा सभागृहात चैतन्य निर्माण झालेले होते. आजच्या सोडतीत आपल्याला घर लागते की नाही, याची उत्सुकता अर्जदारांना लागलेली होती. ज्या अर्जदारांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही; अशा अर्जदारांना सोडतीचे थेट प्रेक्षपण पाहता यावे, म्हणून सभागृहाबाहेरील परिसरात मंडप उभारण्यात आला होता. येथे चार ते पाच स्क्रीनवर सोडतीचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत होते. शिवाय यशस्वी अर्जदारांच्या नावांचा उल्लेख असलेल्या प्रिंटआऊट मंडपातील फलकावर प्रदर्शित करण्यात येत होत्या, त्यामुळे सभागृहासह बाहेर उभारण्यात आलेल्या मंडपातही अर्जदारांची गर्दी झाली होती. यामध्ये पुरुषांसह महिलांचा विशेषत: तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.शीव येथील प्रतीक्षा नगर, पवई आणि मालवणी-मालाड येथील म्हाडाच्या घरांसाठी सर्वाधिक अर्ज आले होते. अर्जांचा आकडा घरांच्या कित्येक पटींनी अधिक होता. सोडत सुरु असताना उपस्थित अर्जदारांचा जीव अक्षरश: टांगणीला लागलेला होता.विजेता घोषित झाल्यानंतर टाळ्यांचा गजर होत होता. (प्रतिनिधी)‘आनंद गगनात मावेनासा’गोरेगावला म्हाडाचे घर लागले आहे. आनंद गगनात मावेनासा झाला आहे. मुंबईत घर असावे, हे स्वप्न होते. ते पूर्ण झाले आहे.- विजयकुमार लुफा‘गोरेगावात घर मिळाले’गोरेगावला घर मिळाले आहे. मुंबईत स्वत:चे घर व्हावे हे स्वप्न होते. म्हाडाच्या सोडतीमुळे घराचे स्वप्न साकार झाले आहे.- अ‍ँंन्थोनी कॉन्टीहो‘घर मिळाल्याचा आनंद’मुंबईत भाड्याने राहत होतो. हक्काचे घर झाले आहे. म्हाडाचे घर लागले याचा आनंद असून, पुढील सोडतीसाठी अर्जदारांना शुभेच्छा. - अंकुर जोहरी‘मुंबईत घर झाल्याचा आनंद’सध्या औरंगाबाद येथे राहतो. आता पवईला म्हाडाचे घर लागले आहे. मुळात मुंबईत घर झाले याचाच जास्त आनंद आहे.- विजय खारकर‘अतिशय आनंद झाला’म्हाडाचा कर्मचारी असून, म्हाडाचे घर लागले याचा अधिक आनंद आहे. स्वत:च्या घराचे स्वप्न साकार होणे यापेक्षा दुसरा आनंद नाही.- उमेश वानखेडे४६ देशांतील २६ हजार नागरिकांनी पाहिली सोडतम्हाडाच्या सोडतीचे थेट प्रक्षेपण ४६ देशांतील २६ हजार नागरिकांनी पाहिल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे. सकाळी ४० देशांतील २० हजार नागरिक सोडतीचा कार्यक्रम पाहत होते. दुपारी १२च्या सुमारास ४२ देशातील २२ हजार नागरिक हा कार्यक्रम पाहत होते. तर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तब्बल ४६ देशातील २६ नागरिकांनी म्हाडाच्या सोडतीचा कार्यक्रम संकेतस्थळावर पाहिल्यादा दावा प्राधिकरणाने केला.विजेत्यांचा म्हाडाकडून सत्कारमुंबईतील विविध ठिकाणांवरील घरांची सोडत काढण्यात येत असतानाच विजेत्यांपैकी अँन्थोनी कॉन्टीहो, अंकुर जोहरी, विजय खारकर, उमेश वानखेडे, महेश कोष्टे आणि विजयकुमार लुफ्ता या विजेत्यांना सभागृहाच्या व्यासपीठावर सन्मानपूर्वक बोलावण्यात आले आणि त्यांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला. म्हाडाचे घर लागल्यानंतर यापैकी अनेकांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिल्या; यावेळी विजेत्यांच्या डोळ्यांत आनंदांश्रू तराळले. अभिनेत्री छाया कदम यांनाही म्हाडाचे घरमराठी चित्रपट ‘सैराट’मध्ये ‘अक्का’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री छाया कदम हिला शीव प्रतीक्षानगरमध्ये म्हाडाचे घर लागले आहे. ‘परशा’ आणि ‘अर्ची’ पळून हैदराबादला आल्यानंतर त्यांना ‘अक्का’ आपल्या घरात आश्रय देते. ‘सैराट’ मध्ये छायाची छोटीशी भूमिका होती. त्या भूमिकेतही तिने आपला ठसा उमटवला. ‘फॅन्ड्री’ चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘भिडू’साठी छायाला दादासाहेब फाळके उत्कृष्ट सहायक अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.हेमांगी कवी, सुहास परांजपे यांनाही घरअभिनेत्री हेमांगी कवी आणि सुहास परांजपे यांनाही म्हाडाचे घर लागले आहे. हेमांगीने म्हाडाच्या घरासाठी यापूर्वी तब्बल सातवेळा अर्ज केला होता. अखेर आठव्या प्रयत्नात तिला यश मिळाले. हेमांगी सध्या ‘ती फुलराणी’तून छाप उमटवत आहे. सुहास परांजपे एका मालिकेत सासूच्या भूमिकेत असून, त्यामुळे ती चर्चेत आहे.