शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तके वाचा आॅनलाईन

By admin | Updated: April 19, 2016 01:23 IST

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील भाषा आणि संस्कृतीशी निगडित पुस्तके आता अभ्यासक व वाचक यांना आॅनलाईन उपलब्ध होणार आहेत

पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील भाषा आणि संस्कृतीशी निगडित पुस्तके आता अभ्यासक व वाचक यांना आॅनलाईन उपलब्ध होणार आहेत. त्यादृष्टीने काम सुरू झाले असून, पहिल्या टप्प्यात संस्थेतील ४० ते ५० हजार पुस्तकांचा ठेवा डिजिटल रूपात उपलब्ध होणार आहे.संस्थेत सध्या १ लाख ३० हजारांहून अधिक दुर्मिळ व ऐतिहासिक ग्रंथ आहेत. त्यांपैकी ४० ते ५० हजार पुस्तकांच्या प्रतींचे पुनर्मुद्रणच झालेले नाही. त्यामुळे ही पुस्तके सर्वांसाठी खुली व्हावीत, यासाठी संस्थेच्या वतीने डिजिटायझेशनच्या कामासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.उद्योगपती जितेन गजारिया यांनी १५ लाखांचा स्कॅनर संस्थेला भेट दिला असून, जर्मनीतून तो येत्या १५ दिवसांत संस्थेत दाखल होईल. त्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. अशा प्रकारच्या आणखी २ स्कॅनरची संस्थेला आवश्यकता असून, ते मिळाल्यास हे डिजिटायझेशनचे काम लवकरात लवकर पूर्ण करता येऊ शकेल, असे भांडारकर संशोधन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पटवर्धन म्हणाले, ‘‘संस्थेतील कोणतेही पुस्तक बाहेर घेऊन जाण्याची परवानगी नसल्याने अनेक जणांना येथील ग्रंथसंपदेचा लाभ घेता येत नाही. त्यादृष्टीने हा डिजिटायझेशनचा प्रकल्प निश्चितच आशादायक ठरणार आहे.’’संस्थेला राज्यातील विविध संस्था व व्यक्ती आर्थिक साह्य करीत असल्याने या प्रकल्पासाठी शासनाची मदत घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.याविषयी प्रभारी ग्रंथपाल मेघना देशपांडे म्हणाल्या, ‘‘पहिल्या टप्प्यातील ४० ते ५० हजार पुस्तके म्हणजे २५ ते ३० लाख पाने ई-लायब्ररीच्या स्वरूपात उपलब्ध होतील.’’ ही पुस्तके पीडीएफ फॉरमॅटमध्ये असतील व वाचकांना सशुल्क उपलब्ध करून दिली जातील, असे भांडारकरचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर म्हणाले. (प्रतिनिधी)