शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

कुणाचा गड पक्का, कुणाला बसला धक्का! वाचा सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल एकाच क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 06:42 IST

राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे निकाल जाहीर

मुंबई - राज्यात झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपले गड राखण्यात यश मिळवत बाजार समितीवरील पकड कायम ठेवली असून, भाजपने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत आव्हान उभे केले आहे.  शिवसेनेच्या ठाकरे गटानेही शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्या पॅनलला दणका देत मालेगाव बाजार समिती जिंकली आहे. शिंदे गटाने मुरबाड (जि. ठाणे) आणि छत्रपती संभाजीनगर बाजार समितीवर आपला झेंडा रोवला आहे.

अहमदनगर : लंकेंचा विखेंना धक्काजिल्ह्यात सात पैकी चार ठिकाणी महाविकास आघाडी तर दोन ठिकाणी भाजपची सत्ता आली. संगमनेरमध्ये काॅंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी सत्ता राखली. राहुरी येथे राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विखे-कर्डिले या भाजप नेत्यांना धूळ चारली. श्रीगोंदात भाजपचे बबनराव पाचपुते व काॅंग्रेसचे राजेंद्र नागवडे यांचे संयुक्त पॅनल पराभूत झाले. राष्ट्रवादीचे राहुल जगताप यांनी तेथे एकहाती सत्ता घेतली. पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके व शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्या आघाडीने भाजप खासदार सुजय विखे यांच्या पॅनलला धूळ चारली. कर्जतला राम शिंदे व राष्ट्रवादीचे रोहित पवार या दोघांच्याही पॅनलने समसमान नऊ जागा जिंकल्या. 

खान्देश : मंत्री भुसेंच्या ‘दादागिरी’ला हिरेंचा ब्रेक!नाशिकमधील मालेगाव येथे मंत्री दादा भुसे यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला. चांदवडमध्ये भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांना सत्ता गमवावी लागली. येवल्यात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी वर्चस्व राखले.  

भुसावळ : खडसे-चौधरी, अरुणभाईंचे पॅनल पराभूतजळगाव जिल्ह्यातील जामनेरात सर्व जागा पुन्हा एकदा भाजपकडे, तर रावेरला मविआने बाजी मारली. चोपडा येथे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या नेतृत्वाखालील पॅनल पराभूत झाले.  जामनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजपने सर्व १८ जागा जिंकल्या आहेत. भुसावळमध्ये आमदार संजय सावकारे यांच्या  पॅनलने १५ जागा जिंकल्या, माजी आमदार संतोष चौधरी व आमदार एकनाथ खडसे यांच्या पॅनलला तीन जागा मिळाल्या आहेत.

लातूर, नांदेडमध्ये काँग्रेस; बीडमध्ये पंकजांना धक्का

नांदेड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला, हिमायतनगरमध्ये काँग्रेसला तर कुंटूरमध्ये काँग्रेस-भाजप युतीला यश मिळाले. लातूरमध्ये काँग्रेसचा गड कायम राहिला. उदगीरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत पॅनलने झेंडा फडकविला आहे.  औसा व चाकूरमध्ये भाजपाने २ समित्या ताब्यात घेतल्या. धाराशिवच्या परंडा, वाशी, उमरगा, मुरूम, कळंब येथे मविआची सत्ता तर धाराशिव, तुळजापूर व भूम भाजप-शिवसेना महायुतीकडे गेल्या आहेत.

काकाला पुतण्या भारी, बहिणीपेक्षा भाऊ वरचढबीड जिल्ह्यातील आठ बाजार समितीपैकी पाच ठिकाणी राष्ट्रवादी व युतीचे पॅनल विजयी झाले आहेत. बीडमध्ये आ. संदीप क्षीरसागर यांनी विविध पक्षांसोबत युती करून आपले काका माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मात दिली आहे. परळीत भाजप नेत्या तथा माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनलचा राष्ट्रवादीचे आ. धनंजय मुंडे यांच्या गटाने धुव्वा उडवला आहे. केवळ केजमध्ये भाजपचे वर्चस्व राहिले आहे.

चंद्रपूर : सात समित्यांवर काँग्रेस, दोनवर भाजप चंद्रपूर जिल्ह्यातील  कोरपना, ब्रह्मपुरी, सिंदेवाही आणि मूल या चार बाजार समित्यांवर काँग्रेसने, तर चिमूर आणि नागभीड बाजार समित्यांवर भाजपने निर्विवाद यश मिळवले आहे. यामध्ये सिंदेवाही बाजार समिती काँग्रेसने भाजपकडून, तर चिमूर बाजार समिती भाजपने काँग्रेसकडून हिरावून घेतली आहे. चंद्रपूर, राजुरा व वरोरा बाजार समितीच्या निवडणुका काँग्रेस आणि भाजपने युती करून लढविल्या आणि निर्विवादपणे जिंकल्या आहेत.

गोंदिया : फिफ्टी-फिफ्टी निकालगोंदिया  जिल्ह्यातील चार बाजार समित्यांपैकी तिरोडा आणि आमगाव बाजार समित्यांवर भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले; गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत चाबी (अपक्ष) व काँग्रेसने १४ संचालक निवडून आणत बहुमत प्राप्त केले. अर्जुनी-मोरगाव बाजार समितीत मतदारांनी फिफ्टी-फिफ्टी असा कौल दिल्याने येथे भाजपचे नऊ आणि महाविकास आघाडीचे नऊ संचालक निवडून आले. 

भंडारा : नाना पटोलेंना धक्काभंडारा आणि लाखनी या दोन्ही ठिकाणी काँग्रेसला धक्का बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. भंडाऱ्यात  काँग्रेस आणि राकाँ-भाजप-सेना (शिंदे गट) युतीला समसमान कौल मिळाला तर लाखनीमध्ये राष्ट्रवादीचे १४ उमेदवार विजयी झाल्याने येथे काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यातच हे चित्र पुढे आल्याने काँग्रेसच्या गोटात चिंता व्यक्त होत आहे.

अकोला : सर्वपक्षीय पॅनल विजयी पश्चिम वऱ्हाडातील दहाही कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निकालाचे चित्र स्पष्ट झाले असून, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांना हादरे बसले. मात्र, मतमाेजणीच्या अखेरच्या क्षणी सत्ता राखण्यात यश आले.  मलकापुरात चैनसुख संचेती सरस ठरले असून, देऊळगावराजात आमदार राजेंद्र शिंगणे यांनी डाॅ. शशिकांत खेडेकरांना धूळ चारली. अकोल्यात सर्वपक्षीय सहकार पॅनलने वंचित बहुजन आघाडीचा पराभव केला.

बुलढाण्यात भाजप-शिवसेनाबुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर बाजार समितीत भाजप व शिवसेना शिंदे गटाने तर मेहकर बाजार समितीत शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या भूमिपुत्र शेतकरी पॅनलने ११ जागा जिंकत बाजी मारली. वाशिम बाजार समितीने पुन्हा एकदा गोटे घराण्यावर विश्वास दाखवत काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), वंचित बहुजन आघाडी व मित्रपक्ष (महायुती) प्रणित  पॅनलने सत्ता मिळवली. मानोऱ्यात महाविकास आघाडीला स्पष्ट कौल मिळाला.

पुण्यात राष्ट्रवादीपुणे जिल्ह्यात हवेली वगळता राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली. मंचर समितीत बंडखोर देवदत्त निकम निवडून आले. दौंडमध्ये रमेश थोरात यांच्या सत्तेला आमदार राहुल कुल यांनी धक्का लावला. हवेलीत राष्ट्रवादीचे बंडखोर आणि भाजपपुरस्कृत शेतकरी विकास आघाडी पॅनलने १८ जागांपैकी १३ जागांवर विजय मिळवला. 

सांगलीत महाविकास आघाडी, विटात काॅंग्रेस

सांगली : महाविकास आघाडीला, इस्लामपुरात राष्ट्रवादीला, तर विटा बाजार समितीमध्ये काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या युतीला बहुमत मिळाले. सातारा : जावळी महाबळेश्वरमध्ये भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील यांच्या एकत्रित युतीच्या शेतकरी विकास पॅनलने सर्व १८ जागा जिंकल्या.

रत्नागिरी : बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय ‘सहकार पॅनल’चे विजय मिळविला.

बागडेनानांच्या पॅनलला यश : मविआला चार जागाछत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखालील भाजप - शिंदे गटाच्या पॅनलने घवघवीत यश मिळाले. पंधरापैकी अकरा जागांवर या पॅनलचे उमेदवार निवडून आले.

अमरावती : महाविकास आघाडीचा कब्जाअमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या पॅनलने सर्व १८ जागांवर कब्जा करीत भाजप, शिंदे सेना आणि आमदार रवी राणा यांच्या शेतकरी पॅनलला चारी मुंड्या चीत केले. तिवसा, चांदूर रेल्वे, भातकुली, मोर्शी येथेही मविआला घवघवीत यश आले. मोर्शीत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या गटाचा पराभव झाला.

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, पंढरपूर आणि कुर्डूवाडी बाजार समितीत अनुक्रमे भाजपचे आ. मोहिते-पाटील, भाजपचे परिचारक व राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे गटाने सत्ता कायम राखली.