शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक पिशव्यांवर पुन्हा बंदी

By admin | Updated: April 26, 2016 03:36 IST

प्लास्टिकला अटकाव करण्यासाठी त्याच्या वापरावरच बंदी घालण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुन्हा एकदा घेतला आहे

कल्याण : कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणारे अडथळे दूर करण्यातील महत्त्वाचा अडथळा ठरलेल्या प्लास्टिकला अटकाव करण्यासाठी त्याच्या वापरावरच बंदी घालण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुन्हा एकदा घेतला आहे. महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे पासून कल्याण-डोंबिवलीत स्वच्छतेची मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका मुख्यालयात सोमवारी पार पडलेल्या बैठकीत प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदीचा निर्णय घेण्यात आला.२६ जुलै २००५ मध्ये आलेल्या महापुरानंतर सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती. राज्य शासनाच्या आदेशानुसार ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांच्या वापरावर निर्बंधाची कारवाई महापालिका आणि नगरपालिकांच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती. काही काळ त्याची अंमलबजावणी योग्यपद्धतीने झाली. नंतर मात्र त्यात ढिलाई आली. त्यामुळे सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा खच दिसू लागला. डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात प्लास्टिक पिशव्यांचा मोठा अडथळा होता. न्यायालयाने बांधकाम बंदी घातल्याने प्लास्टिक पिशव्यांविरोधात मोहीम उघडमे पालिकेला क्रमप्राप्त होते. शिवाय दरवर्षी पावसाळापूर्व नालेसफाई करताना प्लास्टिक पिशव्या हाच सफाईतील मुख्य अडसर असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे नव्याने प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय पालिकेने घेतला. महापौर राजेंद्र देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १ मे पासून सुरू होणाऱ्या स्वच्छता मोहीमेसंदर्भात घेतलेल्या बैठकीला सभागृहनेते राजेश मोरे, शिवसेना गटनेते रमेश जाधव, भाजपा गटनेते राहुल दामले, महापालिका सचिव सुभाष भुजबळ, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी उपस्थित होते. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात १ मे पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणणे, २८ आणि २९ एप्रिलला संबंधित व्यापारी, दुकानदारांना नोटीसा बजावणे, त्रयस्थ व्यक्तींची प्रभागनिहाय ‘स्वच्छता दूत’ म्हणून नेमणूक करणे, त्यांना नोटीसा देण्याचे अधिकार प्रदान करणे, महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षकांनाही दंडाचे अधिकार प्रदान करणे आदी महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले. (प्रतिनिधी)