शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

Bank Holiday Today: राज्यात आज सार्वजनिक सुट्टी, पण बँका सुरु असणार का? RBI काय म्हणाली पहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 00:07 IST

Bank Holiday Today in Maharashtra: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. परंतू, केंद्राच्या अखत्यारीतील बँका सुरु असतील का याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.  

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे आज राज्यभरातील शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. परंतू, केंद्राच्या अखत्यारीतील बँका सुरु असतील का याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.  

एसबीआय, बँक ऑफ इंडिया सारख्या सरकारी आणि खासगी बँका या केंद्र सरकारच्या म्हणजेच आरबीआयच्या अखत्यारित येतात. यामुळे राज्याने घेतलेले निर्णय त्यांच्यावर लागू होत नाहीत. केंद्र सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केलेला असला तरी सार्वजनिक सुटी जाहीर केलेली नाही. असे असले तरी परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली राज्य सरकारने घेतलेले निर्णय राष्ट्रीय बँकांनाही त्या राज्यापुरते लागू होतात. यामुळे आज ७ फेब्रुवारी बँका सुरु राहतील की बंद असतील याबाबत लोक प्रश्न विचारत होते. यावर आरबीआयने उत्तर देत लोकांमधील संभ्रम दूर केला आहे. 

याच कारणाने आरबीआयने मुंबईत होणारी मॉनिटरी मिटींगची तारीख एक दिवसाने पुढे ढकलली. आज होणारी ही तीन दिवसीय बैठक उद्या म्हणजेच ८ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात येणार आहे. याला आरबीआयने लतादीदींच्या दुखवट्याचे कारण दिले आहे. तसेच महाराष्ट्र वगळता देशभरातील बँका आज सुरुच राहणार आहे. फक्त महाराष्ट्रातील बँका, वित्तीय संस्था बंद राहणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. तसेच जे कोणतेही व्यवहार पेंडिंग असतील ते ८ फेब्रुवारीला केले जातील, असेही आरबीआयने म्हटले आहे. 

महाराष्ट्र सरकारने 7 फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केल्यामुळे, सरकारी सिक्युरिटीज (प्राथमिक आणि दुय्यम), परकीय चलन, मुद्रा बाजार आणि रुपया व्याजदर डेरिव्हेटिव्ह्जमध्ये कोणतेही व्यवहार आणि सेटलमेंट होणार नाहीत असे आरबीआयने म्हटले आहे. सर्व थकित व्यवहारांचे सेटलमेंट त्यानुसार पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंत म्हणजे 8 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलले जाईल, असे RBI ने एका निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक