शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रावतेंची मागणी मान्य, शेतकऱ्यांना मिळणार 10 हजारांची मदत

By admin | Updated: June 13, 2017 15:57 IST

कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना बियाणं खरेदी करण्यासाठी तातडीची मदत देण्यात यावी, अशी मागणी दिवाकर रावते यांनी केली.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12-  राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कॅबिनेटची आज महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत कॅबिनेट मंत्री दिवाकर रावते यांनी शेतकऱ्यांना दहा हजार रूपयांची मदत करण्याची मागणी केली. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांना बियाणं खरेदी करण्यासाठी तातडीची मदत देण्यात यावी, अशी मागणी दिवाकर रावते यांनी केली. सरकारनेही ही मागणी मान्य केली असून शेतकऱ्यांना १० हजार रूपयांची तातडीची मदत देऊ केली आहे.  त्यामुळे पुढील हंगामासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांना १० हजार रुपयांपर्यंत हंगामी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रावते यांनी केली. सरकारने बँकांना त्यासंदर्भातील आदेश द्यावेत. कर्जमाफी झाल्यानंतर हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यातून कापून घ्यावे. तसेच येत्या आठ दिवसांत कर्जमाफीसंदर्भात अंतिम निर्णय घेतला जावा, अशी मागणी रावते यांनी केली.
 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचे निकष ठरवण्यासंदर्भात कॅबिनेटची बैठक घेण्यात आली. कर्जमाफी देताना कशाप्रकारे खबरदारी घ्यायची, याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे. उच्चाधिकार मंत्रिगट आणि सुकाणू समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला होता. यात शेतकऱ्यांना तत्वत: सरसकट कर्जमाफी देणार असल्याचं सरकारने घोषित केलं होतं. या घोषणेनंतर सोमवारी सकाळपासून मंत्रीगटाच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्या होत्या. 
कर्जमाफीसाठी जमिनीची कुठलीही अट नसेल असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर करदात्यांना कर्जमाफीतून वगळण्याचे संकेतही चंद्रकांत पाटलांनी दिले आहेत. त्यामुळं नोकरदारांना कर्जमाफी मिळणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. 
 
 
तुम्ही तुमचं बघून घ्या- अरूण जेटली
 
शेतक-यांच्या कर्जमाफीवर केंद्रीय अर्थ मंत्री अरूण जेटली यांनी मोठं विधान केलं आहे. राज्य सरकारांची इच्छा असेल तर त्यांनी स्वतःच्या खर्चातून शेतक-यांची कर्जमाफी करावी असं म्हणत अरूण जेटलींनी एकप्रकारे कर्जमाफीपासून हात झटकले आहेत.  राज्य सरकार शेतक-यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतात. मात्र, केंद्र सरकार त्यांची मदत करणार नाही, स्वतःच्या निधीतून राज्यांनी कर्जमाफी करावी असं जेटली म्हणाले. महाराष्ट्रासारखे राज्य कर्जमाफीच्या बाजुचे आहे, त्यांनी स्वतःच्या खर्चातून कर्जमाफी करावी. “ज्या राज्यांना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करायची आहे, त्यांना स्वतःच आपले उत्पन्नाचे स्त्रोत स्वत:च शोधावे लागतील”,  असं जेटली म्हणाले आहेत. 
 
आणखी वाचा
 
कर्जमाफी! केंद्र सरकारने झटकले हात, जेटली म्हणाले तुमचं तुम्ही बघून घ्या
 
 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकार समर्थ
 
शेतकऱ्यांचं कर्जमाफ करायला राज्य सरकार समर्थ असल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. जीएसटीमुळे राज्य सरकारला सुमारे 17 हजार कोटी रूपयांची अतिरीक्त लाभ मिळणार आहे…त्यातून कर्जमाफीसाठी पैसा उभा करु असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. तसेच सरकारकडे पैसा उभारण्यासाठी इतर अनेक मार्ग असल्याचं मुटंगटीवार म्हणाले. आहेत.
 
आणखी वाचा
 
शेतकरी कर्जमाफीला जमीनमर्यादा नाही