नाशिक : आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते व आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी बहुचर्चित ‘पीके’ चित्रपटाचे नाव न घेता त्याच्यावर टीका केली. हिंदू साधू-महंत तलवारी घेऊन धावणार नाहीत वा बॉम्ब टाकणार नाहीत, हे हिंदी चित्रपटवाल्यांना ठाऊक असल्यानेच ते असे चित्रपट काढत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. ते म्हणाले की, बॉलिवूड चित्रपटांतील खलनायकांना नेहमी मोठा टिळा लावलेला दाखवले जाते. चित्रपटांतून हिंदू देवतांची विटंबना केली जाते. हा भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा डाव आहे. आपली संस्कृती उदार आहे. इतर देशांत असे नाही. तेथे कोणी थोबाडीत मारले, तर प्रतिउत्तरादाखल चपराकच मिळते. फ्रान्समध्ये एका व्यंगचित्रावरून झालेल्या हल्ल्यात बारा लोक ठार झाले, तर तेथे जगभरातले नेते जमले. भारतात रोज दोनशे लोक मरतात, त्याची कोणालाच किंमत नाही, अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.
रविशंकर यांची ‘पीके’वर टीका
By admin | Updated: January 14, 2015 05:41 IST