शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

रावल यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करुन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा... - नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 19:27 IST

भाजपमधील मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया असून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने खरेदी करत आहेतच शिवाय त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचीही जमीन बळकावली असून

मुंबई - भाजपमधील मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया असून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने खरेदी करत आहेतच शिवाय त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचीही जमीन बळकावली असून रावल यांना धर्मा पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत धरुन त्यांच्यावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा आणि त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी त्याचबरोबर त्यांना मदत करणारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.धुळे जिल्हयातील विखरण देवाचे येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी रात्री निधन झाले. त्यांना शिंदखेडा औष्णिक प्रकल्पात गेलेल्या त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला मिळाला नाही. म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. यूपीए काळामध्ये ग्रामीण भागात चौपट मोबदला आणि शहरी भागात दुप्पट मोबदला देण्याचा कायदा झाला होता परंतु २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने हा कायदा बदलण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर हा कायदा मोदी सरकारला बदलता आला नाही.

शिंदखेडामधील औष्णिक प्रकल्पाचे भूसंपादन हे २००९ मध्ये करण्यात आले त्यावेळी काही शेतकऱ्यांनी विरोध केला तर काहींनी पाठिंबा दिला. त्यामध्ये धर्मा पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचा विरोध होता. आणि योग्य मोबदला मिळाला नसल्यानेच धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली मात्र ही आत्महत्या नसून ती हत्या आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

१९७६ मध्ये भूसंपादन कायदा आल्यानंतर एखादयाकडे ५० ते ५२ एकरच्यावर जमीन ठेवता येत नसताना रावल यांच्याकडे दोंडाई येथे वेगवेगळी कुटुंब दाखवत ८०० एकर जमीन उपलब्ध आहे. इतका मोठा भूसाठा कसा. यांची जमीनीची भूक संपत नाही हे यावरुन दिसत आहे.जयकुमार रावल यांचे दोन जिल्हयामध्ये भूमाफियासारखे काम सुरु आहे.  शेतकऱ्यांची जमीन कवडीमोलाने खरेदी करायची आणि करोडो रुपयांनी विकायची असा धंदा रावल आणि कंपनीचा सुरु असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.

२००६ साली ४ हेक्टर जमीन बहाणे नावाचा गाव आहे तिथे पंचरत्ना रावल या नावाने संपादीत जमीन घेतली. आणि त्या जमीनीवर १ कोटी रुपयांचा मोबदला घेतला याचे पुरावे आमच्याकडे आहेत. याबाबतची तक्रार मुख्यमंत्री, जिल्हयाचे पोलिस अधिक्षक आणि एसीबीकडे करण्यात आल्यावर कारवाईला सुरुवात झाली मात्र मुख्यमंत्र्यांनी दबाव आणत ही कारवाई थांबवली असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

शिंदखेडा आणि परिसरातील जमीन ही २००९ मध्ये भूसंपादीत झाली. कायदयाने नोटीफिकेशन निघाल्यानंतर जमीन खरेदी करता येत नाही. तरीही रावल यांनी १.७६ हेक्टर जमीन २० एप्रिल २०१२ ला २ लाख ८३ हजार रुपयांना खरेदी केली. कायदयाने नोटीफिकेशन झाले असताना रजिस्टारने दस्ताऐवज तयार केला कसा. जमीनीचा फेरफार कसा करण्यात आला. याचा अर्थ जमीन खरेदी झाली म्हणजे तो बेकायदेशीरपणे जमीन व्यवहार झाला असा आमचा आरोप आहे.

धर्मा पाटील यांच्या जमीन मोबदल्यासंदर्भात २२ जानेवारीला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनामध्ये बैठक ठेवण्यात आली होती परंतु ती बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळेच धर्मा पाटील यांनी आत्महत्या केली. ती आत्महत्या नाही तर ती हत्या आहे. जयकुमार रावल आणि त्यांची कंपनी एखादया भूमाफियासारखी दहशत पसरवत आहे. शेतकऱ्यांना सोडत नाहीच आहे शिवाय त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि त्यांच्या चार भावांची २७ एकर जमीन बळकावली आहे. आज माजी राष्ट्रपतींना न्यायालयात दाद मागावी लागत आहे इतका धुमाकुळ सुरु आहे.

रावल यांच्याबाबत लेखी तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत परंतु मुख्यमंत्री त्यांची पाठराखण करत आहेत शिवाय एसीबीवरही कारवाई न करण्याबाबत दबाव आणत आहेत असाही आरोप नवाब मलिक यांनी केला.

एकनाथ खडसे यांना एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात मंत्रीमंडळातून काढण्यात आले मग रावल यांच्याविषयी तक्रारी असून मुख्यमंत्री का कारवाई करत नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दयायला हवे आणि खडसेंना जो न्याय लावला तोच न्याय रावल यांना लावणार का असा सवालही नवाब मलिक यांनी केला.

दरम्यान जमीन हडपण्याचा प्रकार २०१४ पूर्वी झाला असेल किंवा कोणत्याही काळात झाला असेल तर कुणालाही क्षमा न करता गुन्हा दाखल करा अशी आमची मागणी आहे.

या पत्रकार परिषदेला प्रवक्ते संजय तटकरे,क्लाईड क्रास्टो उपस्थित होते

टॅग्स :Dharma Patilधर्मा पाटील