रत्नागिरी : शहरातील मारुतीआळी परिसरात शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. या आगीत तिन्ही दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. दोन तासांच्या परिश्रमांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. रविवारी मध्यरात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मारूतीआळी परिसरात मुस्तफा महमद शफी ईब्जी यांचे ‘हमेरा कलेक्शन’ नावाचे कपड्याचे दुकान आहे. त्याला लागूनच ‘वेलकम फुटवेअर’ व ‘स्टार जनरल स्टोअर्स’ ही दुकाने आहेत. (वार्ताहर)
रत्नागिरीत आग; तीन दुकाने खाक
By admin | Updated: February 13, 2017 03:32 IST