शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सैन्य भरतीस रत्नागिरी, सिंधुदुर्गचा प्रतिसाद कमी

By admin | Updated: January 29, 2015 00:06 IST

ही भरती सैनिक जनरल ड्युटी, सैनिक टेक्निकल, सैनिक क्लर्क, स्टोअर किपर, सैनिक नर्सिंग असिस्टंट व सैनिक ट्रेड्समन या ट्रेडकरिता होणार आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यात खेड, चिपळूण येथे माजी सैनिकांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, त्या तुलनेत सध्या रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतील युवक सैन्यात भरती होण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे, अशी खंत कोेल्हापूर येथील सैनिक मुख्यालयाचे कर्नल राहुल वर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली.रत्नागिरीतील युवकांना सैनिकांना सैन्य भरतीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागते, ही बाब लक्षात घेऊन रत्नागिरीत ११ दिवसांची भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या सहा जिल्ह्यांसाठी तसेच गोव्यातील दोन जिल्ह्यांतील युवकांसाठी रत्नागिरीच्या शिवाजी स्टेडिअमवर दि. ८ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत महासैन्यभरती मेळावा होणार आहे, याची माहिती देण्यासाठी आज कर्नल राहुल वर्मा यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांच्यासमवेत सुभेदार मेजर जे. एस. नागरा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर जगन्नाथ आंब्रे तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अनिल सरदेसाई, अजित करंदीकर, एकनाथ पवार, भास्कर नाठाळकर, माजी सैनिक सुभाष सावंत, शंकर मिलके, मनोज पाटील, महेश पलसपगार आदी उपस्थित होते. ही भरती सैनिक जनरल ड्युटी, सैनिक टेक्निकल, सैनिक क्लर्क, स्टोअर किपर, सैनिक नर्सिंग असिस्टंट व सैनिक ट्रेड्समन या ट्रेडकरिता होणार आहे. रत्नागिरीत २००६ साली सैन्य भरती झाली होती. त्यावेळी १२,५०० उमेदवार उपस्थित होते. मात्र, त्यानंतर आताचे चित्र पाहता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील उमेदवारांमध्ये या भरतीबाबत उदासीनता दिसून येते. याउलट सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात सर्वाधिक सैन्य भरती होते. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून सुमारे १० - १२ हजार जवान उपस्थित राहात असल्याचे कर्नल वर्मा यांनी सांगितले. ते म्हणाले, देश सेवा करण्याची ही एक अतिशय शुभ संधी आहे. मात्र, यासाठीही त्यांच्या देशासाठीच्या योगदानाची कदर करूनच इतर शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा चांगले मानधन मिळते, असे वर्मा म्हणाले.सैन्य भरती प्रक्रियेबाबत माहिती देताना कर्नल वर्मा म्हणाले की, आता सैन्य भरतीची प्रक्रिया बदलली आहे. ही भरती प्रक्रिया नि:पक्षपाती, पारदर्शी स्वरूपाची होणार आहे. तसेच बायोमेट्रिक पद्धतीचाही वापर होणार असल्याने बनावट उमेदवाराची निवड होण्याची शक्यता नाही. तसेच प्रत्येक चाचणीसाठी वेगवेगळे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या भरती प्रक्रियेत कुठल्याही दलालांना थारा मिळणार नाही. त्यामुळे निश्चित निवड होण्याचा दावा करून आर्थिक व्यवहार करणाऱ्यांपासून सावध राहावे. यात पात्रतेनुसार निवड होणार असल्याचे कर्नल वर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)अशी होणार सैन्यभरतीसैन्यभरतीचा जिल्हानिहाय कार्यक्रम असा : ८ फेब्रुवारी सिंंधुदुर्ग, ९ फेब्रुवारी सोलापूर, १० फेब्रुवारी रत्नागिरी, ११ फेब्रुवारी कोल्हापूर, १३ फेब्रुवारी सांगली. १४ फेब्रुवारी रोजी गोवा राज्यातील दोन जिल्हे आणि १५ फेब्रुवारी रोजी सातारा.२६ फेब्रुवारीला लेखी परीक्षाभरतीचे वैशिष्ट्य म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी सेवारत सैनिक, माजी सैनिक, युध्दविधवा, विधवापत्नी, त्यांचे पाल्य, खेळाडू व बाहेरील ेफड ढ४ल्ली यांनी सिद्ध केलेले व महाराष्ट्र, गोवा व गुजरात राज्यातील कनिष्ठ अधिकारी (धर्मगुरु फक्त) यांच्याकरिता तसेच १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र, गोवा व गुजरात या राज्यातील एज्युकेशन हवालदार करीताही यावेळी भरती होणार आहे. यावेळी निवड झालेल्यांची तसेच पूर्ण भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांची १८ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय चाचणी होणार आहे. त्यानंतर यात निवड झालेल्यांची २६ फेब्रुवारीला लेखी परीक्षा होणार आहे.