शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय नसल्यास रेशन बंद !

By admin | Updated: January 3, 2017 18:49 IST

तालुक्यातील ग्राम पंचायत पांगरी माळी येथे हागणदारीमुक्त गाव अभियान युध्दपातळीवर राबविण्यात येत आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबाचे 'राशन' बंद करण्याचा ठराव ग्रामपंचायतने घेतला आहे.

गजानन गोरे/ऑनलाइन लोकमतदेऊळगावराजा (बुलडाणा), दि. 3 - तालुक्यातील ग्राम पंचायत पांगरी माळी येथे हागणदारीमुक्त गाव अभियान युध्दपातळीवर राबविण्यात येत आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबाचे 'रेशन' बंद करण्याचा ठराव ग्रामपंचायतने घेतला आहे.ग्रामपंचायत पांगरी माळी येथे आजवर २६० शौचालयांचे उद्दीष्ठ पुर्ण झालेले असून सुमारे ८५ टक्के उद्दीष्ठ पुर्णत्वाकडे असल्याची माहिती सरपंच अनुसयाबाई बाजीराव वाघ यांनी दिली. नुकतेच स्थानिक व्यंकटेश विद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून गावामध्ये स्वयंसेवकांनी शौचालयासाठी ७० खड्डे खोदलेत. गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी गुडमॉर्निंग पथक स्थापन केलेले आहे. तरीसुध्दा उर्वरीत कुटुंबांनी शौचालय बांधून त्याचा  वापर करावा, यासाठी ग्राम पातळीवर विविध प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ग्रामपंचायतने मासीक ग्राम सभेमध्ये शौचालय नसलेल्या कुटुंबांचे ह्यराशनह्ण बंद करण्याचा महत्वपुर्ण ठराव घेतला आहे. यामध्ये सदर कुटुंबाचे रेशन तसेच ग्रामपंचायत दाखले व महसूल दाखले न देण्याचा निर्णय घेतल्याने गाव संपूर्ण हागणदारीमुक्त होईल, असा विश्वास सरपंच पती तथा पाणलोट समितीचे अध्यक्ष बाजीराव (नाना) वाघ यांनी  'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केला. तर सरपंच अनुसया बाजीराव वाघ यांनी सांगितले की, नविन शौचालयासाठी ग्रामस्थांंच्या कुठल्याही अडचणी सोडविण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम राहील.  गाव शंभरटक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी तसेच स्मार्ट व्हिलेज व आय.एस.ओ.कडे वाटचाल करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून आपले गाव आदर्श बनविण्यासाठी सहकार्य करावे. यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी आपल्या पाठीशी राहून आवश्यक सहकार्य करण्यास तयार आहे, असे ग्रा.पं.पांगरी माळीच्या सरपंच अनुसया बाजीराव वाघ यांनी सांगितले.  

  ''शौचालय बांधकामासाठी लाभार्थ्यांना आपण स्वत:हून लागणारे साहित्य दगड, विटा, रेती, सिमेंट व इतर साहित्य पूरवून सहकार्य करू. गावाच्या विकासासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा व आपले गाव आदर्श गाव बनविण्याचा प्रयत्न करून सहकार्य करावे,'' असे आवाहन पांगरी माळीच्या पाणलोट समितीचे अध्यक्ष बाजीराव वाघ यांनी केले.  .