विटा (जि. सांगली) : ग्रामदैवत नाथदेवाच्या यात्रेत रथ मिरवणुकीवेळी गुलाल उधळण्याच्या कारणावरून माहुली (ता. खानापूर) येथील काठ्या व कुºहाडीने मारामारी झाली. त्यात सात महिलांसह ११ जण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी विटा पोलिसांत १३ जणांसह अन्य २० ते २५ अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश हणमंत बंडगर (वय १९), तेजस किसन सुतार (२२), चेतन चंद्रकांत स्वामी (२७), अवधूत धनाजी देवकर (२०) व राहुल रामचंद्र पवार (२१, सर्व रा. माहुली) या पाच जणांना अटक केली आहे. माहुली येथील ग्रामदैवत नाथदेवाची यात्रा सुरू आहे. सोमवारी दुपारी ३ला रथाची मिरवणूक सुरू असताना रथासमोर गुलाल उधळण्याच्या कारणावरून सौ. शालन भगवान फाळके यांचा नातू रंजन बिपीन फाळके याला संशयित राजू नंदकुमार पाटील व चेतन चंद्रकांत स्वामी यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पाटील व स्वामी यांनी रात्री उशिरा पुन्हा जमाव जमवून फाळके वस्तीकडे मोर्चा वळविला. त्या वेळी पाटील, स्वामी या दोघांसह अन्य १३ जणांनी शालन फाळके, रंजन, दर्शन, अनिता, प्रेरणा बिपीन फाळके, पार्वती विठ्ठल फाळके, संगीता जगदीश फाळके, मंगल उत्तम फाळके, अमोल विठ्ठल फाळके व मंगल अशोक वायदंडे यांना जातीवाचक शिवीगाळ करून काठ्या व कुºहाडीने मारहाण केली. त्यात ११ जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी मंगळवारी पहाटे १३ जणांसह अन्य २० ते २५ अनोळखींविरुद्ध शालन फाळके यांनी फिर्याद दिली. त्यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, अन्य संशयित फरारी आहेत. (वार्ताहर)
रथयात्रेत मारामारी; ११ जण जखमी
By admin | Updated: May 21, 2014 03:49 IST