शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

रतन टाटा संघ दरबारी!

By admin | Updated: December 29, 2016 03:56 IST

टाटा समूहाचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी सुमारे २० मिनिटे चर्चा

नागपूर : टाटा समूहाचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देऊन, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी सुमारे २० मिनिटे चर्चा केली. सायरस मिस्त्री यांना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर टाटा समूह वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशा स्थितीत टाटांनी सरसंघचालकांची भेट घेतल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. बुधवारी दुपारी रतन टाटा नागपुरात दाखल झाले. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर, ते थेट रेशीमबाग येथील संघ स्मृतिमंदिर परिसरात गेले. तेथे त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. काही वेळ त्यांनी स्मृतिमंदिर परिसराची पाहणी केली व संघाच्या विविध प्रकल्पांविषयी जाणून घेतले. त्यानंतर, ३ वाजताच्या सुमारास ते संघ मुख्यालयात दाखल झाले.टाटांची ही भेट नेमकी कशासंदर्भात होती, टाटा समूहातील विवादासंदर्भात उभयतांमध्ये चर्चा झाली का, याबाबत त्यांनी मौन राखले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर टाटा यांनी या निर्णयाचे अगोदर स्वागत केले होते व नंतर टीकाही केली होती. संघ पदाधिकारी सोबतसंघ मुख्यालयात देशातील मोठ्या असामींची अधूनमधून वर्दळ असते. सत्ता परिवर्तनानंतर येणाऱ्या ‘व्हीआयपीं’चे प्रमाण वाढीस लागले आहे. कुणालाही संघातर्फे विशेष वागणूक दिली जात नाही. मात्र रतन टाटांसाठी मात्र संघाने अक्षरश: ‘रेड कार्पेट’च अंथरले. विमानतळावरील त्यांच्या आगमनापासून अखेरपर्यंत संघ पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते. वाढदिवसाच्या शुभेच्छारतन टाटा यांचा बुधवारी ७९ वा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिल्यामुळे त्यांचा हा दौरा आणखी विशेष झाला. सरसंघचालकांनी यावेळी त्यांना विशेष शुभेच्छा दिल्या व त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. संघ स्मृतिमंदिरात महानगर संघचालक राजेश लोया यांनी विशेष भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी संघाचे महानगर सहकार्यवाह अरविंद कुकडे व प्रचार प्रमुख समीर गौतम उपस्थित होते.संघाच्या समाजकार्यात सहभागी होण्याची इच्छारतन टाटा यांनी संघाच्या विविध सेवाकार्यांबाबत स्मृतिमंदिर परिसरात जाणून घेतले. विविध प्रकल्पांची कार्यप्रणाली, संघ स्वयंसेवकांची भूमिका याबाबत देखील त्यांनी विचारणा केली. संघाच्या समाजकार्यात सहभागी होण्याची इच्छा त्यांनी यावेळी प्रदर्शित केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.पुढील आठवड्यात चंद्रपुरातचंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे सुरू करण्यात येत असलेल्या अत्याधुनिक बांबू प्रशिक्षण केंद्राबाबत प्रशासन व टाटा ट्रस्ट यांच्यात ५ जानेवारी रोजी सामंजस्य करार होणार आहे. संघाच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रात बांबू प्रकल्प चालतात. देशी उद्योगांना चालना देण्यासाठी उद्योग समूहांतर्फे पुढाकार घेण्यात आला तर त्यामुळे ग्रामीण भागात जास्त उद्योगनिर्मिती होऊ शकेल, असे संघ पदाधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे टाटा यांचे संघस्थानी येण्याला महत्त्व आले आहे. (प्रतिनिधी)ही औपचारिक भेट : संघया संदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, ही भेट औपचारिक व पूर्वनियोजित होती, असे त्यांनी सांगितले. या भेटीचा राजकारण व उद्योगाशी काहीही संबंध नव्हता. रतन टाटा यांची अनेक दिवसांपासून संघस्थानाला भेट देण्याची इच्छा होती. त्यानुसार, ते येथे आले, असे संघ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.