शहरं
Join us  
Trending Stories
1
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
2
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
3
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
4
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
5
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
6
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
7
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
8
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
9
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
10
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
11
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
12
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
13
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
14
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
15
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
16
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
17
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
18
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
19
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
20
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

रतन टाटा सरसंघचालकांच्या भेटीला

By admin | Updated: December 28, 2016 18:33 IST

टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली.

ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 28 - टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन सुमारे 20 मिनिटे चर्चा केली. सायरस मिस्त्री यांना बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर टाटा समूह वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशा स्थितीत टाटांनी सरसंघचालकांची भेट घेतल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले. 

बुधवारी दुपारी रतन टाटा अचानक नागपुरात दाखल झाले. संघाच्या पदाधिकाऱ्यांनीच त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर ते थेट रेशीमबाग येथील संघ स्मृतिमंदिर परिसरात गेले. तेथे त्यांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. काही वेळ त्यांनी स्मृतिमंदिर परिसराची पाहणी केली व संघाच्या विविध प्रकल्पांविषयी जाणून घेतले. त्यानंतर 3 वाजताच्या सुमारास ते संघ मुख्यालयात दाखल झाले. 
संघ मुख्यालयात त्यांनी डॉ. भागवत यांच्याशी सुमारे 20 मिनिटे बंदद्वार चर्चा केली. ही भेट नेमकी कशासंदर्भात होती, टाटा समूहातील विवादासंदर्भात यात चर्चा झाली का याबाबत त्यांनी मौन राखले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर टाटा यांनी या निर्णयाचे स्वागत केले होते.  
सरसंघचालकांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छारतन टाटा यांचा बुधवारी ७९ वा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी संघ मुख्यालयाला भेट दिल्यामुळे त्यांचा हा दौरा आणखी विशेष झाला. सरसंघचालकांनी यावेळी त्यांना विशेष शुभेच्छा दिल्या व त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली. ही औपचारिक भेट : संघयासंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ही भेट औपचारिक व पूर्वनियोजित होती, असे त्यांनी सांगितले. या भेटीचा राजकारण व उद्योगाशी काहीही संबंध नव्हता. रतन टाटा यांची अनेक दिवसांपासून संघस्थानाला भेट देण्याची इच्छा होती. त्यानुसार ते येथे आले, असे गोपनीयतेच्या अटीवर संघ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.