शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

उत्तर भारतीय एकगठ्ठा मतांसाठी रस्सीखेच

By admin | Updated: January 21, 2017 02:28 IST

एकला चलो रेचा काँग्रेसचा नारा यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे

शेफाली परब,

मुंबई- युतीबाबत साशंकता, स्वबळावर शंभर जागा निवडून आणण्याचे भाजपाचे लक्ष्य, मित्रपक्षानेच शिवसेनेसमोर उभे केलेले आव्हान, एकला चलो रेचा काँग्रेसचा नारा यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. अशा वेळी निर्णायक ठरणाऱ्या उत्तर भारतीय मतांकडे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चा वळवला आहे. विविध कार्यक्रम, मेळावे व समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून उत्तर भारतीयांची एकगठ्ठा मते आपल्या बाजूने वळवण्याचे राजकीय पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विकासाच्या मुद्द्याबरोबरच जातींचे समीकरण ही निवडणुकीत जमेची बाजू ठरत असते. एखाद्या समाजाची एकगठ्ठा मते पारड्यात पडल्यास त्या पक्षाच्या विजयाचा मार्ग सुकर होत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये उत्तर भारतीयांची लोकसंख्या मुंबईत वाढत आहे. मतदानातही त्यांचा टक्का मोठा असल्याने त्यांची मते आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या पारंपरिक मतदारांवरही भाजपा व इतर पक्षांनी हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. >राजकीय पक्षांची नजर मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये दहिसर, कांदिवली, बोरीवली, मालाड येथील १८, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरीमध्ये १८, उत्तर मध्य विभागात विलेपार्ले, सांताक्रूझ, वांद्रे, कुर्ला येथे २३, उत्तर पूर्व परिसरात मुलुंड, भांडुप, घाटकोपर, गोवंडी, शिवाजीनगर या ठिकाणी २२, सायन-कोळीवाडा, धारावी तर दक्षिण मुंबईत वरळी, भायखळा, मुंबादेवी, कुलाबा अशा १०७ प्रभागांमधील उत्तर भारतीय मते निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे राजकीय पक्ष या प्रभागांमध्ये सक्रिय झाले आहेत. >काँग्रेस पक्षात सर्वाधिक दहा उत्तर भारतीय नगरसेवक आहेत. पारंपरिक मतदार हातून जाण्याच्या भीतीने काँग्रेसने या समाजासाठी स्वतंत्र अजेंडा राबवण्याची तयारी दाखवली आहे. हॉकर योजनेची अंमलबजावणी, १२ हजार उत्तर भारतीयांना टॅक्सीचा परवाना, कांदिवली-चांदिवलीत नेतृत्व उत्तर भारतीयांकडे सोपवण्यात आले आहे.