शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स व्हिडीओची धमकी देऊन ढोंगीबाबाने महिलेबरोबर ठेवले शरीरसंबंध

By admin | Updated: June 2, 2017 10:39 IST

आपल्याकडे विशेष शक्ती असून कॅन्सरसारखा दुर्धर आजार बरा करु शकतो असा दावा करणा-या एका ढोंगीबाबाविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 ऑनलाइन लोकमत 

ठाणे, दि. 2 - आपल्याकडे विशेष शक्ती असून कॅन्सरसारखा दुर्धर आजार बरा करु शकतो असा दावा करणा-या एका ढोंगीबाबाविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका 37 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी साईलाल हीरालालजी जेठीया विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने साईलालवर लैंगिक शोषणाचा आणि तीन लाख रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. 
 
मूळचा गुवहाटीच्या असणा-या साईलाल जेठीयाची 2015 मध्ये पीडित महिलेबरोबर ओळख झाली. साईबाबांची शक्ती आपल्या अंगात असून कॅन्सर रुग्णांना आपण बरे करु शकतो या त्याच्या दाव्यावर महिलेचा विश्वास बसला. पीडित महिलेचे वडिल कॅन्सरने ग्रस्त असल्याने ती सहज त्याच्या जाळयात ओढली गेली. कॅन्सर बरा करण्यासाठी काही विधी करावे लागतील असे सांगून त्याने महिलेकडून 3 लाख रुपये उकळले. 
 
कहर तर तेव्हा झाला जेव्हा ढोंगी साईलाल जेठीयाने पीडित महिलेला ती त्याची गतजन्मातली पत्नी असल्याचे पटवून दिले व तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवायला सुरुवात केली. ढोंगी बाबाच्या गोंड बोलण्यामध्ये फसलेली ही महिला त्याच्यासोबत आसाम, दिल्लीपर्यंत जाऊन आली. तिथे वेगवेगळया हॉटेलमध्ये आरोपीने या महिलेवर बलात्कार केला. जेव्हा पीडित महिलेने शरीरसंबंधाला विरोध सुरु केला तेव्हा साईलाल जेठीयाने या शरीरसंबंधांचे व्हिडीओ सोशल साईटसवर अपलोड करण्याची धमकी तिला दिली. 
 
हा ढोंगी बाबा दोनवर्ष तिच्यावर अत्याचार करत होता. जेव्हा त्याचे अत्याचार सहन करण्यापलीकडे गेले तेव्हा पीडित महिलेने हिम्मत एकवटून पोलीस स्टेशन गाठले व तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी साईलाल जेठीया विरोधात बलात्कार (376), फसवणूक (420), 506 (गुन्हेगारी कट) अशा विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. सध्या साईलाल जेठीया फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.