शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून सालीवर बलात्कार

By admin | Updated: June 14, 2017 20:34 IST

बँकेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून २० वर्षीय सालीला पुणे येथे नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधम मेहुण्याला चिकलठाणा पोलिसांनी

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि, 14 - बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २० वर्षीय सालीला पुणे येथे नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधम मेहुण्याला चिकलठाणा पोलिसांनी २४ तासांत अटक केली. विशेष म्हणजे या प्रकाराची कोणालाही माहिती दिल्यास तुझ्या बहिणीला सोडून देईन अशी, धमकीही त्याने पीडितेला दिली होती. शांतीलाल गोरक्ष खताळ (रा. माळीवाडी, ता. शिवूर, जि. बीड)असे अटक करण्यात आलेल्या आरोपी मेहुण्याचे नाव आहे.सहायक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी याविषयी सांगितले की, आडगाव येथील रहिवासी २० वर्षीय पिडीता सध्या सिडको परिसरातील एका महाविद्यालयात बी.कॉम.चे शिक्षण घेते. तिच्या मोठ्या बहिणीचा विवाह माळीवाडी (ताशिऊर जि. बीड) येथील शांतीलाल खताळ याच्या सोबत विवाह झाला आहे. तो सध्या पुण्यातील हडपसर येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहे. पीडितेची बहिणही याच ठिकाणी खासगी नोकरी करते. १९ एप्रिल रोजी पीडितेच्या बहिणीला आरोपीने माळीवाडी या गावी नेऊन सोडले. त्यानंतर तो कार घेऊन औरंगाबादला आला. आरोपी हा पीडितेच्या कायम संपर्कात होते. तो तिला तुझे बी. कॉम. पर्यंत शिक्षण सुरू आहे. तुला पुणे येथील बँकेत नोकरी लावतो,असे अमिष दाखवित असत. १९ एप्रिल रोजी त्याने तिला पुण्यात तुला नोकरीला लावून देतो, असे सांगून गावाजवळील फाट्यावर बोलावून घेतले. सख्या मेहुणाच आहे. आणि पुणे येथे बहिणीच्याच घरी जायचे असल्याने तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. पुणे येथे नेल्यानंतर आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. २६ एप्रिलपर्यंत त्याचे हे कृत्य सुरू होते. विशेष म्हणजे ही बाब कोणाला ससांगितल्यास तुझी बदनामी होईल आणि पोलिसांत तक्रार दिल्यास तुझ्या बहिणीला मी सोडून देईन,धमकी त्याने दिली. या नंतर पीडिता गावी परतली. दरम्यान तो सतत पीडितेला फोन करून त्रास देत असत. आरोपीच्या या त्रासाला कंटाळून पीडितेने १२ जून रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात मेहुण्यांविरूद्ध फिर्याद नोंदविली. सहाय्यक पोलिस निरिक्षक ताईतवाले यांनी घटनेची गांभीर्य ओळखून एक पथक पुण्याला रवाना केले. पोलिसांच्या पथकाने २४ तासात आरोपी खताळ यास बेड्या ठोक ल्या. महिला पोलिस उपनिरिक्षक राठोड पुढील तपास करत आहेत.