शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

शाळकरी मुलीचे अपहरण करून बलात्कार

By admin | Updated: July 21, 2016 20:08 IST

शाळकरी मुलीचे (वय १२) अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवारी रात्री इमामवाड्यात घडली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २१ : शाळकरी मुलीचे (वय १२) अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना बुधवारी रात्री इमामवाड्यात घडली. या घटनेत एकापेक्षा जास्त आरोपींचा समावेश असल्याचा अर्थात हा सामूहिक बलात्काराचा प्रकार असल्याचा आरोप पोलीस ठाण्यासमोर जमलेला संतप्त जमाव करीत होता. पोलिसांनी मात्र या गुन्ह्यासंदर्भात वाच्यता करण्याचे टाळल्याने सायंकाळपर्यंत गोंधळाचे वातावरण होते.  कोपर्डी प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असतानाच, उपराजधानीत ही घटना घडल्याने पोलीस दलालाही जोरदार हादरा बसला आहे. २० तासांपेक्षा जास्त कालावधी होऊनही या गुन्ह्यातील आरोपीचा छडा लागला नसल्यामुळे, इमामवाडा परिसरात गुरुवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते.  पीडित मुलगी आठवीची विद्यार्थिनी आहे. नेहमीप्रमाणे ती बुधवारी सायंकाळी कराटे प्रशिक्षण वर्गाला गेली होती. वर्ग आटोपून घरी परत जात असताना रस्त्यात तिला एक आरोपी भेटला. ह्यतुझी बहीण माझी मैत्रीण आहे. ती आता इकडेच येत आहेह्ण, असे त्याने तिला फूस लावून मेडिकलच्या मार्गाकडे नेले. तेथे त्याचे दोन मित्र लपून होते. त्यांनी तिला मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात नेऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. रात्री ११ वाजले तरी मुलगी घरी परत आली नाही. त्यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली. तेवढ्यातच ती घरी परतली. तिच्या तोंडावर, हातावर खरचटल्याच्या जखमा होत्या. ते पाहून पालकांनी तिला विचारणा केली. त्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली.पालकांनी लगेच इमामवाडा पोलीस ठाणे गाठले. तक्रार नोंदवून घेतल्यानंतर इमामवाडा पोलिसांनी आरोपीची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, सकाळी या घटनेची वार्ता कळताच परिसरातील संतप्त नागरिकांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त संतोष रस्तोगी, अतिरिक्त आयुक्त सुहास वारके, अतिरिकत आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. गुन्हे शाखेचीही पथके पोहोचली.