शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

खाऊचे आमिष दाखवून बालिकेवर बलात्कार

By admin | Updated: May 20, 2016 02:06 IST

खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील सोनगाव येथे बुधवारी (दि. १८) सायंकाळी घडला.

बारामती : खाऊचे आमिष दाखवून पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील सोनगाव येथे बुधवारी (दि. १८) सायंकाळी घडला. आरोपी ज्ञानेश्वर जनार्दन गुटकडे (वय २१, मूळ रा. वाणेवाडी, जि. उस्मानाबाद, सध्या रा. सोनगाव, ता. बारामती) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, आरोपीला न्यायालयाने २१ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील असणारे या बालिकेचे कुटुंब गेल्या सहा महिन्यांपासून शेतमजूर म्हणून काम करतात. बारामती तालुक्यातच ते काम करीत आहेत. घटनेतील आरोपी हाही उस्मानाबाद जिल्ह्यातीलच आहे. आरोपी चालवत असलेल्या टेम्पोतून शेतमजूर महिलांची ने-आण त्याच्याकडून केली जाते. बुधवारी (दि. १८) देखील या महिला सोनगाव येथीलच एका शेतकऱ्याच्या शेतात खुरपणीसाठी गेल्या होत्या. या वेळी बालिकाही तिच्या आईसमवेत होती. सायंकाळी साडेचारच्या सुमारास आरोपीने पीडित बालिकेला खाऊचे आमिष दाखविले. तसेच पाठीवर बसवून लगतच्या उसाच्या पिकात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला. या घटनेनंतर बालिकेने रडत येऊन तिच्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर आरोपीला स्थानिक ग्रामस्थांनी शेतातच पकडले. त्यानंतर आरोपीला ग्रामस्थांनीच पोलिसांच्या ताब्यात दिले. बुधवारी रात्री या प्रकरणी संबंधित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. तर, आरोपी गुटकडे यास रात्री उशिरा अटक केली.