शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कौमार्य चाचणी केल्यास गुन्हा, बातम्यांची दखल घेणार : रणजित पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 04:06 IST

जातपंचायतीच्या माध्यमातून कौमार्य चाचणी करणे तसेच त्याची जाहीर वाच्यता करणा-या व्यक्तीविरोधातही यापुढे गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्य मंत्री (शहरी) रणजित पाटील यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली.

मुंबई : जातपंचायतीच्या माध्यमातून कौमार्य चाचणी करणे तसेच त्याची जाहीर वाच्यता करणा-या व्यक्तीविरोधातही यापुढे गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्य मंत्री (शहरी) रणजित पाटील यांनी बुधवारी विधानपरिषदेत केली. कौमार्य चाचणीसारख्या प्रथांविरोधात भूमिका घेणा-या युवकांच्या पाठी सरकार ठामपणे उभे असल्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी दिली.शिवसेना आमदार नीलम गो-हे यांनी जातपंचायती आणि कौमार्य चाचणी आदी मुद्दयांवर लक्षवेधी सूचना मांडली. कौमार्य चाचणीमुळे महिलेच्या प्रतिष्ठेवर घाला येतो. जात पंचायतीचे पंच तसेच या प्रक्रियेत असलेल्या तसेच तपासात हस्तक्षेप करणा-या व्यक्तींविरूद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गो-हे यांनी केली. कंजारभाट समाजातील जातपंचायतींनी स्वत:ची घटना आणि नियमावली तयार केली आहे. संविधानालाच आवाहन देण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप गो-हे यांनी केला.यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री पाटील म्हणाले की, जातपंचायत सदस्यांविरूद्ध तसेच अशा प्रकरणात हस्तक्षेप करणा-यांविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. अशा प्रथांच्या विरोधात आवाज उठविणा-या समाजातील सुशिक्षित तरूणांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे.जातपंचायतीच्या माध्यमातून दबाव टाकणा-या किंवा सामाजिक बहिष्कार कायद्याच्या उल्लंघन करणा-या घटनांबद्दल प्रसारमाध्यमात येणा-या बातम्यांची दखल घेऊन पोलिसांकडून ‘स्यू-मोटो’ दखल तात्काळ गुन्हा नोंदविण्यात येईल, असेही रणजित पाटील यांनी स्पष्ट केले.