शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

नाशिकच्या महापौरपदी रंजना भानसी; उपमहापौर गिते

By admin | Updated: March 14, 2017 13:17 IST

महापालिका निवडणूकीत भाजपाने शहरात बहुमत प्राप्त केल्याने मंगळवारी (दि.१४) दुपारी बाराच्या मुहूर्तावर अखेर महापौरांचे निवासस्थान असलेल्या ‘रामायण’ व महापालिकेवर भाजपाचा ध्वज फडकला.

नाशिक : महापालिका निवडणूकीत भाजपाने शहरात बहुमत प्राप्त केल्याने मंगळवारी (दि.१४) दुपारी बाराच्या मुहूर्तावर अखेर महापौरांचे निवासस्थान असलेल्या ‘रामायण’ व महापालिकेवर भाजपाचा ध्वज फडकला. यावेळी महापौरपदासाठी आरक्षित जागेतून एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने रंजना भानसी यांची निवड करण्यात आली. तसेच उपमहापौरपदासाठी रिंगणात असलेल्या सुषमा पगारे यांनी माघार घेतल्यामुळे प्रथमेश गिते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. एकूणच भानसी या भाजपाच्या जेष्ठ कार्यकर्त्या असून त्यांनी पक्षासोबत राखलेल्या निष्ठेचे फळ अखेर त्यांना मिळाले तर नव्यानेच पक्षात आलेले ‘मनसे’चे वसंत गिते यांचे पुत्र यंदा या पंचवार्षिक निवडणूकीतून राजकारणात आले. प्रथमेश गिते हे पहिल्यांदांच नगरसेवक म्हणून निवडून आले अन् शहराच्या उपमहापौरपदाच्या खुर्चीचा मान त्यांना मिळाला.राज्याचे जलसंपदामंत्री व पालकमंत्री गिरिश महाजन, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप यांच्यासह सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांनी रामायणाबाहेर जल्लोष केला . ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत भाजपाने सत्ता स्थापन केल्याचा आनंदोत्सव साजरा केला. नाशिकच्या सर्वागिंण विकासाची जबाबदारी या पक्षाच्या खांद्यावर असून मुंबई, पुणे या सुवर्ण त्रिकोणातील नाशिकला औद्योगिकदृष्टया तसेच पर्यटनाच्या दृष्टीने विकासाच्या दिशेने प्रगतीपथावर नेण्याचे आव्हान या पक्षापुढे आहे. नाशिककरांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये नवखा असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या बाजूने कौल देत राज ठाकरे यांना एकहाती सत्ता सोपविली होती; मात्र पाच वर्षांच्या कालावधीत शहराचा ‘मनसे’ विकास करण्यास यश आले नाही. नाशिकरांनी नाराजी यंदाच्या पंचवार्षिकमध्ये दाखवून देत भाजपाला बहुमत दिले आहे. यामुळे नाशिकरांचा विश्वास सार्थ ठरविण्याचे मोठे आव्हान भाजपाचे महापौर तसेच पालकमंत्र्यांसह आमदारांपुढे आहे. भाजपाने आपल्या वचननाम्यात म्हटल्याप्रमाणे गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच ही दक्षिणगंगा बारामाही प्रवाहित ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष प्रयत्न भाजपाला करुन दाखवावे लागणार आहे.