शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई होणाऱ्या मराठी क्रांती मोर्चाची औरंगाबादमध्ये रंगीत तालिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 14:59 IST

9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी औरंगाबादमध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्दे9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी औरंगाबादमध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आली.बईतील मोर्चाची पूर्व तयारी म्हणून  ही रंगीत तालीम करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे.औरंगाबाद शहरातून निघालेल्या या रॅलीमध्ये महिलांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता.

औरंगाबाद, दि. 1- 9 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी औरंगाबादमध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आली. मुंबईतील मोर्चाची पूर्व तयारी म्हणून  ही रंगीत तालीम करण्यात आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. औरंगाबाद शहरातून निघालेल्या या रॅलीमध्ये महिलांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. यावेळी एक मराठा लाख मराठा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. 

मराठा क्रांती मोर्चाच्या या बाईक रॅलीला छत्रपती महाविद्यालयापासून सुरुवात झाली. गजानन मंदिर, क्रांती चौक, जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे कॅनॉट परिसरात या रॅलीचा समारोप झाला. हजारोंच्या संख्येने महिलांनी तसंच अनेक तरूण-तरूणी या रॅलीत सहभागी झाले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पहिला मूक मोर्चा औरंगाबद शहरामधून काढण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरात विविध शहरात मोठ्या संख्येने ५७ मोर्चे काढण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हे मोर्चे काढण्यात आले. पण सरकारकडून कोणतंही ठोस आश्वासन मिळालं नाही. त्यामुळे ९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये नियोजन बैठकाही घेण्यात आल्या. त्याचाच भाग म्हणून मंगळवारी शहरात बाईक रॅली काढण्यात आली.

9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचा एल्गारयेत्या 9 ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे वादळ मुंबईत धडकणार आहे. सर्व आचारसंहितांचे पालन करून हा महामोर्चा काढला जाईल. ९ ऑगस्टला क्रांतिदिनी पहिला मोर्चा निघाला होता. म्हणून मुंबईतील महामोर्चा ९ ऑगस्टला काढला जाणार आहे.  मुंबईत 9 ऑगस्ट रोजी आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चात जास्तीत जास्त मराठा समाजाने सहभागी व्हावे,यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे काही दिवसांपूर्वी रथयात्रा काढण्यात आली.  टिव्ही. सेंटर येथे सकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रथयात्रा कोपर्डीच्या प्रवासाला रवाना झाली.

कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेला १३ जुलै रोजी एक वर्ष पूर्ण झालं. या घटनेतील नराधमांना  फाशी द्या, मराठा समाजाला आरक्षण द्या, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, यासह विविध मागण्यासाठी गतवर्षी ९ ऑगस्ट २०१६ रोजी औरंगाबादेत पहिला मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता.