शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रणगाड्यांनी शत्रूच्या चौक्या केल्या उद्ध्वस्त; अहमदनगर येथे लष्कराची प्रात्यक्षिके

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 03:37 IST

उपस्थितांच्या डोळ्यांचे फिटले पारणे

निनाद देशमुख/नवनाथ खराडे अहमदनगर : आकाशातून वाऱ्याच्या वेगाने येत बॉम्ब टाकणारे हेलिकॉप्टर, कानठळ्या बसवणाºया तोफांद्वारे शत्रूवर भेदक मारा करत अचूक वेध घेणारे रणगाडे, चारही बाजूने होणारा गोळीबार...अशा परिस्थितीत योग्य नियोजन आणि जोश यामुळे भारतीय सैन्याने शत्रूच्या चौक्यांवर ताबा मिळवत तिरंगा फडकवला. हा थरार सोमवारी उपस्थितांनी के. के. रेंज येथे प्रत्यक्ष अनुभवला.

लष्कराच्या अहमदनगर येथील आर्मड कोअर सेंटर व स्कूल, मॅकेनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर तर्फे सोमवारी के.के रेंज वर आॅपरेशन ‘कवच प्रहार’ या युद्ध प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यात लष्कराच्या टँंक रेजिमेंटची चपळता, गतिशीलता आणि भेदक रणगाड्यांची मारक क्षमता उपस्थितांनी अनुभवली. यावेळी आर्मड कोर अ‍ॅण्ड स्कूल अ‍ॅण्ड मॅकेनाइज्ड इंफंटरी रेजिमेंटल सेंटरचे प्रमुख मेजर जनरल एस. झा आणि मित्र राष्ट्रांच्या लष्कराचे प्रतिनिधी उपस्थित होते.

भारतीय लष्कराचे रणगाडे त्यांची मारक क्षमता आणि वेगवान हालचाली करण्याची क्षमता दाखवणासाठी तसेच डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज आणि टेक्निकल स्टाफ आॅफिसर कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी या युद्ध प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. तीन तास चाललेल्या या युद्ध सरावाची तीन भागात विभागणी करण्यात आली होती. पहिल्या भागात रणगाडे, बीएमपी वाहने आणि अटॅक हेलिकॉप्टर यांच्या यांत्रिक कौशल्याची माहिती देण्यात आली. दुसºया भागात रणगाडे आणि चिलखती वाहनांची माहिती देण्यात आली.अर्जुन, भीष्म, अजय, टी-९०, टी-७२, बीएमपी-२ या अत्याधुनिक तंत्रप्रणाली असणारे रणगाडे सर्वांचे आकर्षण ठरले. शत्रूला हुलकावणी देऊन पुन्हा तीव्र हल्ला चढविण्याचे सामर्थ्य या रणगाड्यांमध्ये आहे. या रणगाड्यांमध्ये रात्रीची परिस्थिती दिवसासारखी स्पष्टपणे दिसू शकेल, असे तंत्रज्ञान वापरले आहे. जवानांना वाहून नेण्यासाठी हे रणगाडे उपयुक्त ठरतात.रणगाड्यांचे महत्त्व कायम - मेजर जनरल एस. झापहिल्या महायुद्धापासून युद्धभूमीवर रणगाड्यांचा वापर होतो. शंभर वर्षांनंतरही त्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. दहशतवादी कारवायांचाबीमोड करताना, तसेच शत्रुराष्ट्रांच्या सीमारेषेवर रणगाड्यांचा चांगला वापर होऊ शकतो. त्याद्वारे आणीबाणीच्या परिस्थितीवर मात करणे शक्य होते, असे मत मेजर जनरल एस झा यांनी सोमवारी व्यक्त केले.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान