शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

राणेंच्या आमदारकीची वाट बिकटच!७ डिसेंबरला निवडणूक : विरोधक करणार कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 02:54 IST

स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपाशी घरोबा केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषदेवर पुन्हा निवडून येण्यासाठी बरीच दमछाक होईल असे दिसते.

विशेष प्रतिनिधी मुंबई : स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपाशी घरोबा केलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषदेवर पुन्हा निवडून येण्यासाठी बरीच दमछाक होईल असे दिसते. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येऊन त्यांची कोंडी केली जाऊ शकते.राणे यांनी काँग्रेसचा राजीनामा देताना विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या जागेवर ७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. राणे यांना मंत्रिमंडळात घेण्यास शिवसेनेचा विरोध लपून राहिलेला नाही. त्यामुळे राणे हे भाजपाच्या पाठिंब्यावर निवडणुकीत उतरले तर काँग्रेस व राष्टÑवादीशी हातमिळवणी करून शिवसेना राणेंची कोंडी करू शकते.भाजपाकडे १२२, शिवसेना ६३, काँग्रेस ४२ तर राष्ट्रवादी ४१ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाला १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने त्यांचे संख्याबळ १३२ इतके आहे. त्यामुळे १४५ चा आकडा साधण्यासाठी त्यांना केवळ १३ आमदारांची गरज असेल. गुप्त मतदानाचा अशावेळी भाजपाला फायदा होऊ शकतो. शिवाय, राणेंच्या उमेदवारीला शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: पुढाकार घेतील, असे म्हटले जात आहे.शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असा भाजपाला विश्वास आहे.भाजपाने राणेंऐवजी अन्य कुणाला उमेदवारी दिली तर राणेंना जुलै २०१८ पर्यंत आमदारकीची वाट पहावी लागू शकते. त्यावेळी विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मात्र, राणे यांना त्यांनी राजीनामा दिलेल्या जागेवरच पुन्हा निवडून आणण्याची भूमिका भाजपाकडून घेतली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेना