शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राणेंनी नियमित केलेले भूखंड नियमबाह्यच

By admin | Updated: August 6, 2016 03:29 IST

१६८ भूखंडांचे झालेले बेकायदा वाटप नियमित करण्याचा तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नियमबाह्य ठरविला़

अहमदनगर : येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील १६८ भूखंडांचे झालेले बेकायदा वाटप नियमित करण्याचा तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नियमबाह्य ठरविला़ त्याचबरोबर हा निर्णय राज्यातील सर्व उद्योगांना लागू राहणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे़नागापूर औद्योगिक वसाहतीतील १६८ भूखंडांचे झालेले बेकायदा वाटप उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केले होते. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उद्योजकांच्या आमी संघटनेसह तीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी़ एस़ ठाकूर व चंद्र खानवीलकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला़ या भूखंडांवर उद्योजकांनी बांधकामे केली असून, सध्या या जागेवर कारखाने सुरू आहेत़ भूखंड ताब्यात घेण्याचा खंडपीठाचा निर्णय न्यायमूर्तींनी कायम केल्याने नगरच्या उद्योगक्षेत्रात खळबळ उडाली आहे़औद्योगिक वसाहतीतील भूखंड वाटपासंदर्भात अजित महांडुळे, विष्णू ढवळे, रुपेश पानसंबळ आणि सोमनाथ कराळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जुलै २०१३ मध्ये याचिका दाखल केली होती़ याचिकेची सुनावणी सुरू असतानाच आमी संघटनाही यात सहभागी झाली़ दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाचे न्या़ एस़ एस़ शिंदे व न्या़ एस़ एस़ संगीतराव पाटील यांच्या खंडपीठाने भूखंडांचे झालेले वाटप नियमबाह्य ठरवित रद्द केले़ एवढेच नव्हे तर भूखंड ताब्यात घेवून त्याचा लिलाव करावा व निविदा पध्दतीने पुन्हा वाटप करा व भूखंड वाटप करणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले़ उद्योजकांनी बचावासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली़ तीन वेगवेगळ्या याचिका यासंदर्भात उद्योजकांनी न्यायालयात दाखल केल्या़ त्यावर न्यायामूर्ती पी़ एस़ ठाकूर व चंद्र खानविलकर यांच्या खंडपीठासमोवर सुनावणी झाली़ न्यायमूर्तींनी वाटप नियबाह्यच असल्यावर शिक्कामोर्तब करत भूखंड ताब्यात घेण्याचा निर्णय कायम ठेवला़ याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील नितीन गवारे यांनी बाजू मांडली़ तर आमी संघटनेच्या वतीने अभिषेक सिंघवी, श्याम दिवाण, इतर उद्योजकांच्या बाजूने शेखर नाफाडे, जयंत भूषण आणि कामगारांची बाजू सुधाकर देशमुख यांनी मांडली़ (प्रतिनिधी)>१७ पट दंड भरून भूखंड नियमितचे आदेशज्याची सर्वाधिक बोली, त्याला वाटप, हा निकष डावलून २००९ ते २०१३ या काळात भूखंडांचे वाटप करण्यात आले़ जाहिरात न देताच हा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यावर महामंडळाने चौकशी समितीही नियुक्त केली़ त्यात बेकायदा भूखंड वाटप प्रकरणात अनेक अधिकारी, कर्मचारी आणि उद्योजकांचे हात गुंतल्याचा आरोप होता़ समितीने भूखंड बेकायदा ठरविल्यानंतर उद्योजकांनी तत्कालीन उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेवून भूखंड नियमित करण्याची मागणी केली होती़ राणे यांनी २९ मे २०१३ रोजी १७ टक्के दंड आकारून भूखंड नियमित करण्याचे आदेश जारी केले होते़ मात्र ते आता वादाच्या भोवऱ्यात अडकले असून, उद्योजकांसह अधिकारीही अडचणीत आले आहेत़